Agriculture news in marathi The papaya season is in full swing; Flowering begins | Page 2 ||| Agrowon

पपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित वाढली असून, पीक सध्या जोमात आहे. पावसाने शेतात पाणी साचून नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी पिकात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. 

जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित वाढली असून, पीक सध्या जोमात आहे. पावसाने शेतात पाणी साचून नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी पिकात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. 

बुरशीनाशके व संप्रेरके ड्रीपमधून पिकाला दिली जात आहेत. खानदेशात नंदुरबारात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपई पीक आहे. एकट्या शहादा तालुक्यात सुमारे ३९०० हेक्टरवर पपई आहे. या पाठोपाठ धुळ्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर पपई पीक आहे. जळगावमध्ये चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा भागात पपई आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यात पपईची लागवड झाली आहे. पीक कमी पावसात जोमात होते. तापी, अनेर नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत अतिपावसानंतर किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित न होणाऱ्या क्षेत्रात पिकाचे काहीसे नुकसान झाले. पाणी साचून राहिल्याने दोन ते पाच टक्के झाडे पिवळी, काळी पडून पूर्णपणे खराब झाली आहेत. 

या स्थितीत शेतकरी पिकात बुरशीनाशके देण्यासह पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या सऱ्या-चऱ्या व्यवस्थित करून घेत आहेत. पिकाला फुलधारणा सुरू आहे. सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला दर्जेदार फळांची काढणी खानदेशात सुरू होईल. अनेक शेतकऱ्यांनी लागवड गादीवाफा पद्धतीने केली आहे. पॉलिमल्चिंगचा वापरही झाला आहे. या क्षेत्रात तण नियंत्रणाची फारशी आवश्यकता नसल्याची स्थिती आहे. परंतु पिकात लव्हाळा व इतर तण येत असल्याने शेतकरी सध्या नाइलाजाने तणनाशकांचा उपयोग करीत आहेत.

पपईचे दर गेल्या हंगामात कमी-अधिक झाले. पण कोविडची समस्या असताना देखील बऱ्यापैकी नफा शेतकऱ्यांना मिळाला. अतिपावसात पिकाची हानी होते, असा गेले दोन वर्षे अनुभव शेतकऱ्यांना आहे. यंदा अति पाऊस येऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.


इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...