agriculture news in marathi Papaya season at its last harvest in Khandesh | Agrowon

खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात

अॅग्रोवन वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पपई पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात पोचत आहे. यंदा कमी दर व प्रतिकूल वातावरण यामुळे हंगाम फेब्रुवारीच्या मध्यातच आटोपण्याची स्थिती आहे. 

जळगाव ः खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पपई पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात पोचत आहे. यंदा कमी दर व प्रतिकूल वातावरण यामुळे हंगाम फेब्रुवारीच्या मध्यातच आटोपण्याची स्थिती आहे. 

पिकात फळगळही सुरू आहे. कारण फळे अवेळी पक्व होत आहेत. थंड प्रदेशात पपईची मागणी असते. परंतु यंदा उत्तरेकडे दिल्ली येथील आंदोलन, पावसाळी स्थिती आदी कारणांमुळे पपईची वाहतूक, उठाव हवा तसा नव्हता. यामुळे दर सुरुवातीपासून कमी होत गेले.

सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जागेवर किंवा शिवार खरेदीत पपईचे दर प्रतिकिलो १८ ते २१ रुपये, असे होते. नोव्हेंबरमध्ये सरासरी दर १० रुपये प्रतिकिलो, असा मिळाला. तर डिसेंबर आणि या महिन्यातील सरासरी दर प्रतिकिलो पाच रुपये, असा आहे. दर कमी असल्याने पीक परवडत नसल्याची स्थिती आहे. पपईची लागवड नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ४२०० हेक्टरवर झाली आहे. 

एकट्या शहादा तालुक्यात ३८०० हेक्टरवर पपई पीक आहे. पपईची लागवड धुळे जिल्ह्यातही शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात सुमारे १२०० हेक्टरवर झाली आहे. तर जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन हजार हेक्टरवर पपई पीक आहे. त्यात यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव या तालुक्यांत पपई पीक आहे. पपईची काढणी राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांचे शहादा, शिरपूर, शिंदखेडा, धुळे येथील एजंट करतात. 

यंदा मोठा फटका
शिवार खरेदी अधिक होत असल्याने खरेदीसंबंधी नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. हे नियंत्रण नसल्याने दर सतत कमी होत गेले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. एकरी २० हजार रुपयेदेखील निव्वळ नफा शेतकऱ्यांना मिळू शकला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात प्रतिकूल वातावरण आहे. ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे पिकाची हानी झाली. सुरुवातीला अतिपावसात अनेकांच्या पपई बागांना फटका बसला. त्यातून सावरल्यानंतर कमी दर व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम झाला. पपईचा हंगाम मार्चपर्यंत सुरू असतो. परंतु यंदा महिनाभर लवकर हा हंगाम संपेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला...सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत...
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची...सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा...
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुखनांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग...अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले...
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ....अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना...बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची...नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील...
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा...नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत...
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे...औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु....
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-...पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध...
सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे...बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात...
पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंदआरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता....
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत...पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘...सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे...
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी...नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र...
गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः...नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची...