भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात
खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पपई पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात पोचत आहे. यंदा कमी दर व प्रतिकूल वातावरण यामुळे हंगाम फेब्रुवारीच्या मध्यातच आटोपण्याची स्थिती आहे.
जळगाव ः खानदेशात प्रसिद्ध असलेल्या पपई पिकाचा हंगाम अंतिम टप्प्यात पोचत आहे. यंदा कमी दर व प्रतिकूल वातावरण यामुळे हंगाम फेब्रुवारीच्या मध्यातच आटोपण्याची स्थिती आहे.
पिकात फळगळही सुरू आहे. कारण फळे अवेळी पक्व होत आहेत. थंड प्रदेशात पपईची मागणी असते. परंतु यंदा उत्तरेकडे दिल्ली येथील आंदोलन, पावसाळी स्थिती आदी कारणांमुळे पपईची वाहतूक, उठाव हवा तसा नव्हता. यामुळे दर सुरुवातीपासून कमी होत गेले.
सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबरमध्ये जागेवर किंवा शिवार खरेदीत पपईचे दर प्रतिकिलो १८ ते २१ रुपये, असे होते. नोव्हेंबरमध्ये सरासरी दर १० रुपये प्रतिकिलो, असा मिळाला. तर डिसेंबर आणि या महिन्यातील सरासरी दर प्रतिकिलो पाच रुपये, असा आहे. दर कमी असल्याने पीक परवडत नसल्याची स्थिती आहे. पपईची लागवड नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ४२०० हेक्टरवर झाली आहे.
एकट्या शहादा तालुक्यात ३८०० हेक्टरवर पपई पीक आहे. पपईची लागवड धुळे जिल्ह्यातही शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात सुमारे १२०० हेक्टरवर झाली आहे. तर जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन हजार हेक्टरवर पपई पीक आहे. त्यात यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, जळगाव या तालुक्यांत पपई पीक आहे. पपईची काढणी राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशातील व्यापाऱ्यांचे शहादा, शिरपूर, शिंदखेडा, धुळे येथील एजंट करतात.
यंदा मोठा फटका
शिवार खरेदी अधिक होत असल्याने खरेदीसंबंधी नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. हे नियंत्रण नसल्याने दर सतत कमी होत गेले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. एकरी २० हजार रुपयेदेखील निव्वळ नफा शेतकऱ्यांना मिळू शकला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात प्रतिकूल वातावरण आहे. ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे पिकाची हानी झाली. सुरुवातीला अतिपावसात अनेकांच्या पपई बागांना फटका बसला. त्यातून सावरल्यानंतर कमी दर व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम झाला. पपईचा हंगाम मार्चपर्यंत सुरू असतो. परंतु यंदा महिनाभर लवकर हा हंगाम संपेल, असे सांगितले जात आहे.