खानदेशातील पपई हंगाम आटोपला

खानदेशातील पपईचा हंगाम आटोपला असून, क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात झाली आहे. या क्षेत्रात कापूस, केळीची लागवड करण्याची तयारी सुरू झाली आहे.
Papaya
Papaya

जळगाव ः खानदेशातील पपईचा हंगाम आटोपला असून, क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात झाली आहे. या क्षेत्रात कापूस, केळीची लागवड करण्याची तयारी सुरू झाली आहे.  पपई पिकाचे बेवड केळी, कापूस किंवा इतर पिकांसाठी लाभदायी मानले जाते. खानदेशात नंदुरबारात पपईची सर्वाधिक लागवड केली जाते. तेथे एकट्या शहादा तालुक्यात ३८०० हेक्टरवर पपई पीक होते. या पाठोपाठ धुळे, जळगाव जिल्ह्यांत लागवड केली जाते. जळगाव जिल्ह्यातही सुमारे साडेतीन हजार हेक्टरवर पपई पीक होते. तर धुळ्यातही तीन हजार हेक्टरवर पपईची लागवड झाली होती. लागवड स्थिर होती. पपईचे दर सुरुवातीला टिकून होते. १८ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवरच मिळाला. नंतर दरात घसरण सुरू झाली. अतिपावसाचा फटका पिकाला सुरुवातीलाच बसला होता. यात चांगले व्यवस्थापन केलेल्या शेतकऱ्यांचे पीक बऱ्यापैकी होते.  पपई उष्णता देणारे फळ आहे. त्याची मागणी हिवाळ्यात सर्वत्र असते. पपईचे क्षेत्र रिकामे करून त्यात पुढे मृग बहर केळी, कापूस व इतर पिके घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत. यंदा दर गेल्या वर्षाएवढेच मिळाले, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरात महिन्यागणिक घट पपई दरात महिन्यागणिक घसरण झाली. दरात १२, ११, ७, ६, ५ व अखेरीस ४ रुपये प्रतिकिलोचा दर पपईला जागेवरच मिळाला. पपईची खरेदी राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली येथील मोठे खरेदीदार एजंटच्या मदतीने करीत होते. दिल्ली येथील आंदोलनाचा फटकाही पपई पिकाला बसला. पपईची मागणी होती, परंतु खरेदी रखडत सुरू होती. यामुळे डिसेंबर, जानेवारीतही दरांवर दबाव होता. त्या वेळेस अनेक शेतकऱ्यांनी पीक काढून क्षेत्र रिकामे केले. जशी उष्णता वाढू लागली, तसे क्षेत्र रिकामे करण्यास सुरुवात झाली. कारण उष्णतेत पपईची मागणी घटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com