agriculture news in Marathi papaya season in last stage in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु, अनेक शेतकरी कलिंगड, काकडी लागवडीसाठी बागा मोडत आहेत. 

जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु, अनेक शेतकरी कलिंगड, काकडी लागवडीसाठी बागा मोडत आहेत. 

जशी उष्णता वाढते, तसा पपईचा हंगाम अंतिम स्थितीकडे पोचतो. कारण, उष्णतेमध्ये पपईची मागणी झपाट्याने कमी होते. सध्या पपईची मागणी उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, राजस्थानसह मुंबई, पुण्यातही कायम आहे. तसेच बागा मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहेत. कारण अतिपावसात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत अनेक शेतकऱ्यांच्या बागांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी तर डिसेंबरमध्येच बागा मोडून क्षेत्र रिकामे केले व त्यावर रब्बी पिकांची पेरणी उरकून घेतली. 

सध्या नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार भागांत बागा बऱ्यापैकी आहेत. तर धुळ्यातील शिरपूर व जळगावमधील चोपडा, जामनेर व यावल भागांत पपईच्या बागा आहेत. या बागांचे उत्तम व्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी चांगले उत्पादनही साध्य केले आहे. दर्जेदार फळे तयार होत आहेत. त्यांना उचलही आहे.

परंतु, बागांना एक वर्षांचा कालावधी पूर्ण होत आल्याने शेतकरी बागा मोडायला सुरुवात करीत आहेत. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल भागांत काही शेतकऱ्यांनी बागा मोडायला सुरुवात केली आहे. यामुळे उत्पादन किंवा पपईची आवक पुढे आणखी कमी होईल. परिणामी, दर स्थिर आहेत. 

शेतकऱ्यांना १६ रुपये दराची अपेक्षा
नुकतीच पपईच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. आता शेतकरी १६ रुपये प्रतिकिलो दरांची अपेक्षा करीत आहेत. कारण सिंचन, रासायनिक खतांचा खर्च, गरज वाढू लागली आहे. उत्पादन खर्च लक्षात घेता दरवाढीची मागणी शेतकरी करीत आहेत. सध्या धुळे व नंदुरबारात मिळून रोज १५ ट्रक (एक ट्रक १० मॅट्रिक टन क्षमता) पपईची आवक होत आहे. दिल्ली, राजस्थान भागातील व्यापारी एजंटच्या माध्यमातून खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...