अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
बातम्या
खानदेशात पपईची ६.४० रुपये किलोने होणार विक्री
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक बागा विषाणूजन्य रोगांसह इतर कारणांमुळे मोडाव्या लागल्या आहेत.
जळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक बागा विषाणूजन्य रोगांसह इतर कारणांमुळे मोडाव्या लागल्या आहेत. उत्तरेकडे पपईचा उठाव वाढत आहे. अशात खानदेशात पपईची किमान सहा रुपये ४० पैसे प्रतिकिलो या दरात शिवार किंवा जागेवर विक्री करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
याबाबत शहादा (जि.नंदुरबार) येथील बाजार समितीमध्ये नुकताच निर्णय झाला. त्यात शेतकरी, काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी आदी उपस्थित होते. पपईच्या अनेक बागा मोडण्यात आल्या आहेत. अशात हवी तेवढी पपई काढणीसाठी उपलब्ध नाही. तर चांगल्या स्थितीमधील अनेक बागा खानदेशात उभ्या आहेत. या बागांमध्ये दर्जेदार पपई उपलब्ध आहे. परंतु चार ते पाच रुपये प्रतिकिलो दरात शिवार खरेदी सुरू होती. हा दर परवडत नसल्याचा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
खानदेशात सर्वाधिक ३८०० हेक्टरवर शहादा तालुक्यात पपई आहे. यापाठोपाठ धुळे व जळगाव जिल्ह्यात पपईचे पीक आहे. पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे पपईचे दर स्थिर राहावेत. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
व्यापाऱ्यांची सहमती
सध्या मजुरी खर्चही वाढला आहे. तसेच शेतकऱ्यांना चार ते पाच रुपये प्रतिकिलोचा दर मान्य नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांनी दर किमान सात रुपये प्रतिकिलो, असावा अशी मागणी सुरवातीला केली. त्यावर एकमत झाले नाही. नंतर दर सहा रुपये ४० पैसे प्रतिकिलो, असा करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यावर व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली. याच दरात शेतकऱ्यांनी पपईची विक्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- 1 of 1537
- ››