agriculture news in Marathi, Parabelled green chilli is stable; Improvement rates | Agrowon

परभणीत हिरव्या मिरचीचे दर स्थिर; दोडक्यात सुधारणा
माणिक रासवे
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

परभणी ः येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गतसप्ताहामध्ये मेथी, वांगे, गाजर, फ्लाॅवर, वाल, शेपू या भाज्याची आवक वाढली. टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत आहेत. हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत, दोडक्याच्या दरामध्ये सुधारणा झाली असून, शेपूचे दर कमी झाले आहेत, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

परभणी ः येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गतसप्ताहामध्ये मेथी, वांगे, गाजर, फ्लाॅवर, वाल, शेपू या भाज्याची आवक वाढली. टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत आहेत. हिरव्या मिरचीचे दर स्थिर आहेत, दोडक्याच्या दरामध्ये सुधारणा झाली असून, शेपूचे दर कमी झाले आहेत, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

जायकवाडी कालव्याच्या आवर्तनामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे लाभक्षेत्रातील गावातून मेथीची आवक होत आहे. गतसप्ताहामध्ये सरसरी मेथीच्या १५ ते २० हजार जुड्यांची आवक राहिली. प्रतिशेकडा दर १५० ते २०० रुपये दर होते. सोमवारी (ता. ४) मेथीच्या २० हजार जुड्याची आवक असताना प्रतिशेकडा १२० ते २५० रुपये दर मिळाले. टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत आहेत. स्थानिक परिसरातून तसेच नाशिक, आंध्र प्रदेशातून टोमॅटोची आवक येत आहे.

गतसप्ताहामध्ये ५०० ते ७०० क्विंटल आवक राहिली तर प्रतिक्विंटल दर ८०० ते १५०० रुपये होते. सोमवारी ६५० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीचे दर स्थिर राहिले. स्थानिक परिसरातून तसेच आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून हिरव्या मिरचीची आवक येत आहे. गत सप्ताहामध्ये हिरव्या मिरचीची ७० ते ८० क्विंटल आवक तर प्रतिक्विंटल दर २५०० ते ४००० रुपये होते.

सोमवारी हिरव्या मिरचीची ७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. गाजराची आवक वाढली आहे. गतसप्ताहामध्ये गाजराची २५० ते ४०० क्विंटल आवक राहिली तर प्रतिक्विंटल दर ५०० ते ८०० रुपये होते. स्थानिक परिसरातील फ्लाॅवरची आवक वाढली असून, गतसप्ताहामध्ये सरासरी ३० ते ४० क्विंटल आवक राहिली तर प्रतिक्विंटल दर ८०० ते १५०० रुपये दर होते.

वांग्याच्या आवकेत वाढ झाली असून, सरासरी ४० ते ४५ क्विंटल आवक राहिली, तर प्रतिक्विंटल दर ८०० ते १५०० रुपये होते. वाल शेंगांची आवक वाढली असून, गतसप्ताहामध्ये सरासरी १५ ते २५ क्विंटल आवक राहिली तर प्रतिक्विंटल दर ८०० ते १५०० रुपये होते. कारल्याची सरासरी ७ ते ८ क्विंटल आवक राहिली प्रतिक्विंटल दर २५०० ते ४००० रुपये होते. दोडक्याच्या दरामध्ये तेजी राहिली. गतसप्ताहामध्ये दोडक्याची सरासरी २ ते ३ क्विंटल आवक राहिली. तर दर प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये होते. शेपूची ५ ते ६ क्विंटल आवक राहिली, तर प्रतिक्विंटल दर १५०० ते २००० रुपये होते शेपूचे दर कमी झाले आहेत, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...