अकोला कृषी विद्यापीठात परम शावक सृष्टी महासंगणकाचे लोकार्पण

अकोला कृषी विद्यापीठात देशातील परम शावक सृष्टी महासंगणकाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते झाले.
अकोला कृषी विद्यापीठात देशातील परम शावक सृष्टी महासंगणकाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते झाले.

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात परम शावक सृष्टी नावाच्या महासंगणकाचे शनिवारी (ता. ११) लोकार्पण झाले. या वेळी उदघाटक म्हणून बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले,''सध्याच्या शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे गरजेचे असून, याला अत्याधुनिक साधनांची जोड मिळाल्यास मोठे बदल शक्य आहेत. उत्पादन व उत्पन्नवाढीसह इतर बाबींसाठी ही साधने पूरक ठरतील.''  व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, सी-डॅक या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर संस्थेचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य; तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. पी. जी. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात हा लोकार्पण सोहळा सकाळी ११ वाजता झाला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महासंगणकाचे लोकार्पण झाले. श्री. धोत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात शासन शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढ़ीसाठी जे प्रयत्न करीत आहे त्याला हे नवीन तंत्र खूप फायदेशीर ठरणार आहे, असे सांगत सविस्तर मार्गदर्शन केले.  कुलगुरू डॉ. भाले यांनी विद्यापीठात सुरू असलेले उपक्रम, संशोधन, शेतकरी विकासासाठी होत असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. डॉ. हेमंत दरबारी यांनीही मनोगत व्यक्त करीत हे तंत्रज्ञान किती फायदेशीर ठरू शकते, याची माहिती दिली. डॉ. इंगोले यांनी प्रास्ताविक केले. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमादरम्यान स्लाइडच्या आधारे नवीन तंत्राचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com