परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची कर्जमाफी 

परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची कर्जमाफी 
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची कर्जमाफी 

परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गंत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील आॅनलाईन अर्ज केलेल्या ३ लाख ३४ हजार २४५ शेतकऱ्यांपैकी यंदाच्या २२ आॅगस्ट अखेरपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र २ लाख ३८ हजार ४२ शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जमाफीची ८४९ कोटी ५६ लाख रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

२०१७ मध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी परभणी जिल्ह्यातील ३ लाख ३४ हजार २४५ शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज भरुन नोंदणी केली. यंदाच्या २२ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका, ग्रामीण बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांचे थकबाकीदार असलेल्या २ लाख ३८ लाख ४२ शेतकरी सभासदांना ८४९ कोटी ५६ लाख रुपये एवढ्या रकमेची कर्जमाफी मिळाली आहे. 

कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या १ लाख ८३ हजार ९८ कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ७०५ कोटी ४५ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या २२ हजार ८१२ कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर १३९ कोटी ३१ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३२ हजार १३२ कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ कोटी ८० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. 

कर्जमाफी योजनेअंतर्गंत निकषात बदल केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची माहिती बॅंकांनी प्रसिद्ध केलेली नाही. अर्जातील त्रुटीमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्यासुद्धा जाहीर केलेली नाही. २०१७ मध्ये आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी अजून ९६ हजारांवर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. मुद्दल आणि व्याज मिळून दीड लाख रुपये रकमेच्या आत कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही काही बॅंकांनी विशिष्ट रकमेची परतफेड करुन कर्ज खाते नील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा घोळ अजूनही सुरू आहे. दीड लाख रुपयांवरील व्याजाची रक्कम भरण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com