agriculture news in Marathi parbhani agriculture university proposal of weather station need permission Maharashtra | Agrowon

`वनामकृवि`च्या कृषी हवामान बदल संशोधन केंद्राला तातडीने मान्यता हवी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 मार्च 2021

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गंत परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने नुकतीच मान्यता दिली आहे. 

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गंत परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने या केंद्राच्या स्थापनेस मंजुरी देऊन पुरेसे मनुष्यबळ आणि वेधशाळा उभारणीसाठी भरीव निधीस तत्काळ मान्यता देणे आवश्यक आहे. 

जिरायती क्षेत्र बहूल मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढते तापमान या नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करत आहेत. यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना गावपातळीवर वेळेवर हवामान सल्ला पोचविण्यासाठी सध्याची संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्य यंत्रणा अत्यंत तोकडी पडत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागासाठी स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्राची नितांत गरज लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वी परभणी येथे कृषी हवामान बदल संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे सादर केला होता. त्यास यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

सद्यःस्थितीतील हवामान संशोधन... 
सध्या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू कृषी संशोधन संस्थेअंतर्गत अखिल भारतीय कृषी हवामान समन्वित प्रकल्प आणि राष्ट्रीय संवेदनक्षम वातावरण बदल समरसता प्रकल्प या दोन प्रकल्पाअंतर्गत अल्प प्रमाणात कृषी हवामान संशोधनाचे काम चालते. भारतीय हवामान विभागाअंतर्गत ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पांव्दारे परभणी जिल्ह्यात तालुका स्तरावर तर इतर जिल्ह्यात ढोबळमानाने जिल्हा स्तरावर कृषी हवामान सल्ला दिला जातो. परंतु हा सल्ला मंडळ आणि गाव स्तरावर उपयोगाचा ठरत नाही. पीक उत्पादनाचा अंदाज वर्तविणे (फसल) प्रकल्पाअंतर्गत जिल्हा स्तरावर मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज काढला जातो. 

हवामान बदल संशोधन केंद्राची उद्दिष्टे 

  • मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर(तालुका-मंडळ) हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भू -हवामान वेधशाळा आणि स्वयंचलित हवामान वेधशाळा कार्यान्वित करणे. 
  • प्रत्येक जिल्ह्यातील हवामान बदलांचा अभ्यास करणे. सुक्ष्म वातावरणीय विभागवार अथवा स्थानिक पातळीवर (तालुका मंडळ) पीक पद्धती विकसित करणे. दुष्काळप्रवण क्षेत्राचे निकष गाव पातळीवर तपासणे, त्यांची नव्याने मांडणी करणे, आपत्कालीन पीक नियोजन सुचविणे, हवामान पीक कॅलेंडर तयार करणे. 
  • प्रत्येक गावात कृषी हवामान सल्ला पत्रिका पोचवणे. 
  • स्थानिकरित्या पाण्याचे बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन काढणे त्यावर आधारित मुख्य पिकांकरिता पीक वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज काढणे, शेतकऱ्यांना हवामान बदलानुसार पीक पाणी व्यवस्थापन वेळापत्रक देणे. 
  • बदलत्या हवामानात त्यात दुष्काळ, पावसाचा खंड, अतिवृष्टी, गारपीट, वादळ, धुके, तापमान,उष्णतेची लाट, थंडीची लाट यामध्ये सहनशील पिकांच्या वाणांची चाचणी, शिफारस, नवीन वाणांची निर्मिती, पीक व्यवस्थापन पद्धती शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणे. 
  • कीड व रोग अनुमान प्रारूप काढणे, स्थानिक पातळीवर पीकनिहाय कीड व रोगाचे अनुमान काढणे, मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज देणे. 
  • हवामान आधारित पीक, फळपिक विमा योजनेसाठी उपयुक्त माहिती शासनास उपलब्ध करुन देणे. 
  • शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगांना सुक्ष्म हवामान विभागानुसार मार्गदर्शन करुन रोजगार निर्मितीसाठी हातभार लावणे. 
  • पावसाचा खंड, गारपीट, उष्णतेची लाट, थंडीची लाट, धुके या सारख्या नैसर्गिक संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी संशोधन तसेच सयंत्रे उपलब्ध करुन देणे.ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, विस्तार कार्य करणे. 

प्रतिक्रिया 
मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी यांच्या हितासाठी स्वतंत्र हवामान बदल संशोधन केंद्र स्थापनेची नितांत गरज आहे. एमसीएईआरने त्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. आता शासनाने त्यासाठी आवश्यक निधीसह मंजुरी द्यावी. 
- डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...