agriculture news in Marathi, Parbhani and Hingoli in reach Agriculture scientist | Agrowon

परभणी, हिंगोलीत शेतीपिकांत पोचले कृषिशास्त्रज्ञ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी या विशेष विस्तार मोहिमेअंतर्गत शास्त्रज्ञांनी आजवर परभणी-हिंगोली जिल्ह्यातील ३० गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विविध पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन याबाबत सल्ला दिला. या मोहिमेअंतर्गत गुलाबी बोंड अळी नियंत्रण तसेच पावसाच्या खंड काळात करावयाच्या उपाययोजना यावर भर दिला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी या विशेष विस्तार मोहिमेअंतर्गत शास्त्रज्ञांनी आजवर परभणी-हिंगोली जिल्ह्यातील ३० गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विविध पिकांवरील कीड रोग व्यवस्थापन याबाबत सल्ला दिला. या मोहिमेअंतर्गत गुलाबी बोंड अळी नियंत्रण तसेच पावसाच्या खंड काळात करावयाच्या उपाययोजना यावर भर दिला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मराठवाडा विभागात सुरवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत पीक संरक्षणाकरिता शेतक­ऱ्यांना शेतावर जाऊन सल्ला देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रे, सर्व महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन योजना तसेच कृषी विभाग यांच्या सहकार्याने `विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी` ही विशेष विस्तार मोहीम राबविण्‍यात येत आहे. 

त्यासाठी वनामकृवितील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याकरिता तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृती आराखडा करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार गावांची निवड करण्यात आली. आजपर्यंत या दोन जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ३० गावातील शेतकऱ्यांच्या प्रत्‍यक्ष शेतावर भेट देऊन चर्चेद्वारे सल्ला देण्यात आला. 

परभणी, हिंगोली जिल्ह्यासाठी शास्त्रज्ञांच्या चमूचे प्रमुख डॉ. यू. एन. आळसे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. बी. लटपटे आहेत. चमूमध्ये कृषिविद्या, कीटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ज्ञांचा समावेश आहे. याअंतर्गत छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. माळधानी (ता. जि. हिंगोली) येथील शेतावर विस्तार शिक्षण संचालक डाॅ. प्रदीप इंगोले, कृषी विद्यावेत्ता डाॅ. यू. एन. आळसे, उपविभागीय अधिकारी बी. एच. कच्छवे यांनी भेट देऊन हळद पिकांची पाहणी केली.

मागणी अाधारित काटेकोर विस्तार शिक्षण ः इंगोले
हंगामी खरीप पिके, ऊस, फळपिके, भाजीपाला आदी पिकांचे संरक्षण, मूलस्थानी जलसंधारण आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. खास करून सध्याच्या अवर्षण परिस्थितीमध्ये पीक व्यवस्थापन, पीक संरक्षणामध्ये प्रामुख्याने बोंड अळी व्यवस्थापन यावर शेतक­ऱ्यांना सल्ला देण्यात येत आहे. मागणी अाधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे मोहिमेचे स्वरूप आहे, असे इंगोले यांनी सांगितले.

इतर बातम्या
एसटी बसमधील ‘वायफाय’ सेवा बंदजळगाव ः राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना...
संशोधन केंद्राने दिले अवजारे दुरुस्तीचे...चंद्रपूर ः शेतकऱ्यांकडील बरीच कृषी अवजारे देखभाल...
डोंगरपायथ्याच्या भातपिकांवर रोगांचा...सिंधुदुर्ग ः ऊन-पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे...
मंचर बाजारात मागणीअभावी बटाटा वाणाची...मंचर, जि. पुणे  : येथील बटाटा बाजारपेठेवर...
नगर जिल्ह्यात खरिपात पीक कापणीचे...नगर  ः खरिपातील पिकांची उत्पादकता निश्चित...
नगरचे पाणी बीड नेणार ही फक्त अफवा ः...नगर  : मुळा धरणातून बीडला पाणी नेणार, हा...
शेतीमाल विक्रीसाठी तीन जिल्ह्यांतील...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
`येलदरी`त ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठापरभणी : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
बुलडाणा जिल्ह्यात वादळ, गारपिटीमुळे ८०...बुलडाणा  : गेल्या आठवड्यात बुलाडाणा...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
मकाप्रक्रिया प्रकल्प, कॉटनहबसाठी...सिल्लोड, जि. औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर...
मोदींनी देशाला बरबाद केलेः राहुल गांधीऔसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या...
दडपशाही थांबविण्यासाठी सत्ता परिवर्तन...नगर ः ‘‘महाराष्ट्र राज्यासाठी ही निवडणूक...
गहू पिकावरील मावा किडीचा घेतला जातोय...आंतरराष्ट्रीय कृषी आणि जैवशास्त्र केंद्र येथील...