परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद 

संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सोमवारी (ता. २७) पुकारलेल्या भारत बंद अंतर्गंत परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद  Parbhani Bandla Composite response
परभणीत बंदला संमिश्र प्रतिसाद  Parbhani Bandla Composite response

परभणी : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सोमवारी (ता. २७) पुकारलेल्या भारत बंद अंतर्गंत परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हमाल, कामगार बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद होते. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.  भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली. सोनपेठ-पाथरी राष्ट्रीय महामार्गावरील विटा येथील तसेच गंगाखेड परभणी रस्त्यावरीळ खळी येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ झरी येथे परभणी जिंतूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. सेलू येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रामेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात अनेक गावांतील शेतकरी, कामगार सहभागी झाले होते. स्वाभिनी शेतकरी संघटना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष आदी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com