परभणीत कैरी प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये

परभणीत कैरी प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये
परभणीत कैरी प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २२) कैरीची ८० क्विंटल आवक होती. कैरीला प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. वालाची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ७०० रुपये दर मिळाले. 

कोथिंबिरीची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. वांग्याची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १३०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ८०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले.

भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. दोडक्याची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले.

काकडीची १५ क्विंटल होऊन प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. गाजराची ८० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com