परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये

परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये
परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २) कारल्याची २० क्विंटल आवक होती. कारल्याला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. 

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ७०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

शेपूची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाले. वांग्याची ५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट ४०० ते ७०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ५५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. भेंडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. 

मधुमक्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यामध्ये बीट रूटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्याची ५ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. लिंबांची १६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगाची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com