परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमी

परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमी
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमी

परभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत वेबपोर्टलवर प्रस्ताव दाखल करण्याची सुविधा धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे जवळच्या जनसुविधा केंद्रावर जाऊन विमा प्रस्ताव भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केले. बुधवार (ता. १८) पर्यंत जिल्ह्यातील ५७ हजार ६७० शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्ताव भरले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परभणी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बुधवारी (ता. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिजित नांदोडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुनील हट्टेकर आदी उपस्थित होते.

श्री. शिवशंकर म्हणाले, की पीकविमा वेबपोर्टल धिम्या गतीने प्रतिसाद देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर आॅनलाइन विमा प्रस्ताव भरण्यासाठी अडचणी येत आहेत. मात्र, आपले सरकार केंद्र, महा ई-सेवा केंद्र या ठिकाणी उत्तम इंटरनेट सेवा असल्याने शेतकऱ्यांनी प्राधान्याने जनसुविधा केंद्रांवर विमा प्रस्ताव भरावा. या केंद्रावर कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. शुल्क घेणाऱ्या केंद्रांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. शुल्क घेत असल्यास तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

बॅंकांनी पीकविमा भरून घेण्यासाठी प्राधान्य द्यावे. यंदा नियुक्त करण्यात आलेल्या इफको-टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीने तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर समन्वयक नेमले आहेत. खातरजमा करून घेण्यासाठी पीकविमा संरक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील किमान पाच टक्के क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी, तपासणी कृषी विभाग तसेच विमा कंपनीचे अधिकारी संयुक्तरित्या केली जाणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना २४ जुलैपर्यंत तर कर्जदार शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत केवळ ऑनलाइन पद्धतीने विमा अर्ज सादर करावयाचे आहेत. गैरसोय टाळण्यासाठी लवकर विमा प्रस्ताव दाखल करावेत. आजवर जिल्ह्यातील ५७ हजार ६७० शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव दाखल केले असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

विमा कंपनीकडून समन्वयक नियुक्त पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोईसाठी इफको-टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या समन्वयकांचे संपर्क क्रमांक जिल्हा समन्वयक ः दीपक कांबळे ७०८३३९५३७८, परभणी तालुका ः विकास जमधाडे ७०८३३९५३७८, जिंतूरः गजानन चाकर ९२८४१७३५९५, सेलू ः सुखदेव सावंत ७८८७५३७०२८, मानवत ः आकाश राक्षे ८९५६५६८६०२, पाथरी ः सुमेध गायकवाड ८६००६६००८२,सोनपेठ ः शेख जहीर ९९७०९३७७९६, गंगाखेड ः बाबासाहेब वाकळे ७५०७६५४५३४, पालम ः नितीन आगळे ९५२७७७४८९८, पूर्णा ः संतोष बेंद्रे ७०२८२१३५५५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com