परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये

परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १३) काकडीची ४० क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. 

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. शेवग्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. 

वांग्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ११०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट १०० ते १५० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मुळ्याची ५ हजार नग आवक होऊन प्रतिशेकडा ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. लिंबाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com