परभणी दुग्धशाळेत जानेवारीत दुधात साडेतेरा लाख लिटरवर घट

Parbhani Dairy reduces milk output to over 13.50 lakh liters in January
Parbhani Dairy reduces milk output to over 13.50 lakh liters in January

परभणी :येथील शासकीय दुग्धशाळेतील दूधसंकलनात गतवर्षीच्या (२०१९) जानेवारी महिन्याच्या तुलनेत यंदा जानेवारीत १३ लाख ६२ हजार ९६० लिटरने घट झाली. यंदा जानेवारीत ४ लाख २५ हजार ७०७ लिटर दूधसंकलन झाले. दूध उत्पादकांची देयके, दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांचे कमिशन वेळेवर अदा केले जात नाही. दूधदरात वाढ केली जात नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दुग्धशाळेच्या दूधसंकलनातील घट कायम आहे.

शासकीय दूध योजनेंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेत परभणी, पाथरी, गंगाखेड, हिंगोली, नांदेड येथील शीतकरण केंद्रांतर्गतच्या सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थांमार्फत दूधसंकलन केले जाते. २०१९ च्या जानेवारी महिन्यात एकूण १७ लाख ८८ हजार ६५७ लिटर दूधसंकलन झाले.

परभणी शीतकरण केंद्रांतर्गत ६ लाख २८ हजार ७५७ लिटर दुधाचे संकलन झाले. परंतु, यंदा जानेवारीत २ लाख ९ हजार ६२३ लिटर दूधसंकलन झाले. गतवर्षीपेक्षा यंदा दूधसंकलनात ५ लाख ९९ हजार १३४ लिटरने घट झाली.  पाथरी येथील दूधसंकलन केंद्रांतर्गत दूधसंकलनात सर्वाधिक म्हणजे ७ लाख ९ हजार ७६२ लिटरने घट झाली.

गतवर्षी येथे ७ लाख ९ हजार ९९२ लिटर दूधसंकलन झाले होते. यंदा मात्र २८ हजार ३१० लिटर दूधसंकलन झाले. गंगाखेड येथील दूध शीतकरण केंद्रांतर्गत गतवर्षीच्या तुलनेत २ लाख ५ हजार ४९८ लिटरने घट झाली. हिंगोली येथील दूधसंकलनात ७७ हजार लिटरने घट झाली आहे.

शासकीय संकलन यंत्रणा तोकडी

सातत्याने दुष्काळी स्थितीला सामोरे जात असलेल्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतीपूरक दुग्धव्यवसायातून उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निर्माण करत आहेत. परंतु, शासकीय दूधसंकलन यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यात गतवर्षीच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून दूध उत्पादकांना वेळेवर देयके, तसेच दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांचे कमिशन वेळेवर अदा केले जात नाही. दूधदरात वाढ केली जात नाही. त्यामुळे ही घट कायम आहे. 

जानेवारीतील तुलनात्मक दूधसंकलन स्थिती (लिटरमध्ये)

शीतकरण केंद्र २०१९ २०२०
परभणी ६२८७५७ २०९६२३
पाथरी  ७०९९९२ २८३१०
गंगाखेड  ३११६७९ १०६१८१
हिंगोली १३८५२९ ६१४४६
नांदेड ००० १९८४७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com