परभणी जिल्ह्यात फळबाग योजनेतून १३७ हेक्टर फळपीक लागवड

परभणी जिल्ह्यात फळबाग योजनेतून १३७ हेक्टर फळपीक लागवड
परभणी जिल्ह्यात फळबाग योजनेतून १३७ हेक्टर फळपीक लागवड

परभणी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गंत २०१८-१९ मध्ये परभणी जिल्ह्यातील ६७५ शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली होती. परंतु दुष्काळी स्थितीमुळे फळबागा लागवडीसाठी तसेच त्या जिवंत ठेवण्यासाठी पाणी नसल्यामुळे प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या ३९९ पैकी २४४ शेतकरी फळबाग लागवड करू शकले नाहीत. सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या १५५ शेतकऱ्यांनी १३७.३४ हेक्टरवर विविध फळपिकांची लागवड केली आहे.

गतवर्षी (२०१८-१९) फळपिकांची लागवड करू न शकलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता. ५) पर्यंत हाॅर्टनेट प्रणालीद्वारे आॅनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गंत जिल्ह्यासाठी २ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या योजने अंतर्गंत जिल्ह्यातील १३ हजार ५७२ शेतकऱ्यांनी १३ हजार ७७९.२० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले होते. ६७५ शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यापैकी ३९९ शेतकऱ्यांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. गतवर्षी फळबाग योजनेची सुरवात उशिरा झाली.त्यामुळे फळबाग लागवडीसाठी मार्च अखेर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती.

तालुकानिहाय फळबाग लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका लागवड क्षेत्र लाभार्थी शेतकरी 
परभणी १४.०० १०
जिंतूर २९.६० ३३
सेलू ३८.५० ४८
मानवत २.१०
पाथरी ५.५०
सोनपेठ १०.०० १०
गंगाखेड ६.७०
पालम ११.८० १४
पूर्णा १९.१४ १९
फळपीकनिहाय लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
फळपीक लागवड क्षेत्र लाभार्थी शेतकरी
आंबा ३६.०९ ३६
पेरू २८.६० ३३
डाळिंब ७.३०  ८
लिंबू २४.३० ३०
मोसंबी २.६०
संत्रा १३.३० १२
सीताफळ १७.४५ २३
चिंच ०.८०
जांभूळ ०.४०
अंजीर १.००
चिकू ५.४०  ७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com