Agriculture news in marathi, Parbhani district breaks the crop loan lending | Agrowon

परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला ‘ब्रेक’

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार महिन्यांमध्ये जिल्ह्यात ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांना २२५ कोटी १३ लाख रुपयांचे (१५.३१ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यात ३७ हजार ११७ नवीन शेतकरी असून ५ हजार ६१० शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक कर्जवाटपाच्या गतीला ‘ब्रेक’ लागला आहे. 

परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार महिन्यांमध्ये जिल्ह्यात ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांना २२५ कोटी १३ लाख रुपयांचे (१५.३१ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यात ३७ हजार ११७ नवीन शेतकरी असून ५ हजार ६१० शेतकऱ्यांनी पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक कर्जवाटपाच्या गतीला ‘ब्रेक’ लागला आहे. 

मागील वर्षी पहिल्या साडेचार महिन्यात ६६ हजार ७०३ शेतकऱ्यांना ३४० कोटी ४७ लाख रुपयांचे (२३.१५ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले होते. यंदा राष्ट्रीयकृत बॅंकांना उद्दिष्ट अधिक आहे. तरीही पीक कर्जवाटपाची गती मात्र संथच आहे. जिल्हा बॅंकेने अर्ध्याहून अधिक उद्दिष्ट पूर्ण केले आहे. खासगी बॅंका आणि ग्रामीण बॅंकेचे कर्जवाटप ५० टक्केच्या आतच आहे.

सर्व बॅंकांना खरीप हंगामामध्ये १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांना सर्वाधिक म्हणजे १ हजार ५२ कोटी ३६ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. परंतु, राष्ट्रीयकृत बॅंकांनी १५ ऑगस्टपर्यंत ६ हजार ६५८ शेतकऱ्यांना ६४ कोटी ७० लाख रुपयांचे (६.२८ टक्के) पीक कर्जवाटप केले. 

खासगी बॅंकांना ५२ कोटी ४७ लाख रुपय एवढे उद्दिष्ट आहे. त्यांनी १ हजार ६५८ शेतकऱ्यांना २७ कोटी ७ लाख रुपयांचे (३५.९४ टक्के)कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २०० कोटी १४ लाख रुपयांपैकी ५ हजार ५७१ शेतकऱ्यांना ४२ कोटी ४१ लाख रुपयांचे (२१.१४ टक्के), तर जिल्हा बॅंकेने १६५ कोटी ४७ लाख रुपयांपैकी २८ हजार ८४१ शेतकऱ्यांना ९० कोटी ९५ लाख रुपयांचे (५४.९६ टक्के) कर्जवाटप केले. सर्व बॅंकांनी एकूण ४२ हजार ७२८ शेतकऱ्यांना २२५ कोटी १३ लाख रुपये (१५.३१ टक्के) पीककर्ज वाटप केले.

पीककर्जाचे नुतनीकरण केलेल्या शेतकऱ्यांना ५२ कोटी ३८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. आजवर एकूण ३७ हजार ११७ शेतकऱ्यांना नव्यानेच १७२ कोटी ७५ लाख रुपयांचे वाटप केले. 

 


इतर बातम्या
खानदेशात कांदा लागवड १४ हजार हेक्‍टरवरजळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील कांदा...
‘कर्जमुक्ती योजनेसाठी येणाऱ्या...अकोला  ः  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
द्राक्षपट्ट्यासह आदिवासी भागात खुलली...नाशिक  : स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महाबळेश्वरची...
आगामी हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे राखून...अकोला  : सोयाबीन पिकाखालील पेरणी...
सांगलीत हळदीच्या उत्पादनात घटसांगली : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आलेला महापूर...
चांद्यात फ्लॉवरच्या निकृष्ट...नगर : तेलंगण राज्यातील एका बियाणे कंपनीचे...
'थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय कायम...सोलापूर  ः राज्य सरकारने थेट जनतेतून सरपंच...
औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई...औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे...
लातूर विभागातील दोन हजार हेक्टरवर फळबाग...नांदेड : कृषीच्या लातूर विभागांतर्गतच्या परभणी,...
अकोला बाजार समितीचे गरजूंना पाठबळअकोला ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने...
उशिराच्या गव्हाला वाढत्या तापमानाचा...जळगाव  ः खानदेशात गहू पिकाची स्थिती...
पपई दरांचा नंदुरबारात पुन्हा तिढाशहादा, जि. नंदुरबार  : सध्या मंदी असल्याने...
पीकविमा भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलन...अमरावती  ः जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात...
गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक...गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात...
ऐन फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या झळा पुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
वनबंधू योजना सुरू करण्यासाठी केंद्राकडे...नाशिक : आदिवासी विभागाच्या वनबंधू योजनेअंतर्गत १४...
कलाग्रामच्या माध्यमातून बचत गटांसाठी...नाशिक : दिल्ली हाटच्या धर्तीवर नाशिकमध्ये...
मराठवाड्यातील रेशीम प्रकल्पाला ग्रीन...औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...