परभणी : तीन लाख ९६ हजारांवर शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर

 In Parbhani district, the farmers have approved crop insurance of three lakh 96 thousand
In Parbhani district, the farmers have approved crop insurance of three lakh 96 thousand

परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत भारतीय कृषी पीक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मूग, उडदाचा पीकविमा परतावा मंजूर केला.

फेब्रुवारी अखेर सोयबीन आणि ज्वारी या पिकांचा विमा परतावा मंजूर केला. त्यामुळे आता जिल्ह्यातील पीकविमा परतावा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ९६ हजार ८२० झाली आहे. चार पिकांचा एकूण २६३ कोटी ५२ लाख २० हजार १८१ रुपये परतावा मंजूर झाला. परताव्याची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जात आहे’’, अशी माहिती कृषी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी  दिली.

पहिल्या टप्प्यात भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्ह्यातील ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांना ११ कोटी ९५ लाख ८३ हजार ४२२ रुपयांचा परतावा मंजूर केला. त्यात ४९ हजार ४८३ शेतकऱ्यांना मुगाचा ९ कोटी ६३ लाख ८७ हजार ८७८ रुपये आणि १५ हजार ९७९ शेतकऱ्यांना उडदाचा २ कोटी ३१ लाख ९५ हजार ५४३ रुपयांच्या परताव्याचा समावेश आहे. 

दुसऱ्या टप्प्यात सोयाबीनचा ३ लाख २ हजार ४२७ शेतकऱ्यांना २४५ कोटी ३१ लाख २५ हजार ३७९ रुपये आणि ज्वारीचा २८ हजार ९३१ शेतकऱ्यांना ६ कोटी २५ लाख ११ हजार ३७९ रुपये पीक विमापरतावा मंजूर  केला.

सन २०१९-२० च्या खरीप हंगामात १ लाख ७८ हजार १३० शेतकऱ्यांनी मुगासाठी, ७२ हजार ९९८ शेतकऱ्यांनी उडदासाठी, ३ लाख २ हजार ४२७ शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी, ३० हजार ७६९ शेतकऱ्यांनी ज्वारीसाठी विमा संरक्षण घेतले होते. 

मूग, उडदाचे पीक शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडला. उत्पादनात मोठी घट आली. सोयाबीन, ज्वारीच्या काढणी हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते.

 मंडळनिहाय सोयाबीन परतावा प्रतिहेक्टरी रक्कम (रुपये)  

परभणी तालुका परभणी ८३०४,  पेडगाव ८९७६, पिंगळी ८०४३, दैठणा ८५६३, सिंगणापूर ९६९९, जांब ७६६६, झरी ५५२१.
जिंतूर तालुका  जिंतूर ८५२७, बोरी ८६६८, सावंगी म्हाळसा ९०८६, चारठाणा ११९३६, आडगाव ६७९८, बामणी १४०३०.
सेलू तालुका  सेलू ८८४७, देऊळगाव गात ९०६०, कुपटा ९७७९, वालूर ९६८४, चिकलठाणा १४७५८.
मानवत तालुका मानवत ७७१०, कोल्हा ९४८६, केकरजवळा ६०१२.
पाथरी तालुका पाथरी ७७२९, बाभळगाव ६८२२, हदगाव ९८२७.
सोनपेठ तालुका सोनपेठ ५७३१, आवलगाव ९६९१.
गंगाखेड तालुका गंगाखेड १०६१९, महातपुरी २२२८२, माखणी ८३९८, राणीसावरगाव ७२९६. 
पालम तालुका पालम २५०२४, चाटोरी ३०४७९, बनवस २८९७४.
पूर्णा तालुका  पूर्णा ८९९५, कात्नेश्वर ६९६६, ताडकळस १०४९४, लिमला १५९९१, चुडावा १०८५७.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com