Agriculture news in marathi, Parbhani district has approved Rs 42 lacs frouit crop insurence | Agrowon

परभणी जिल्ह्यात दोन कोटी ४२ लाखांचा फळपीक विमा मंजूर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

परभणी : पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजना २०१८-१९ (आंबे बहर)अंतर्गत जिल्ह्यातील ४९९ शेतकऱ्यांना संत्रा, केळी, आंबा या फळपिकांच्या नुकसानीबद्दल २ कोटी ४२ लाख ४९ हजार ५६१ रुपये परतावा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४५३ शेतकऱ्यांना २ कोटी १७ लाख रुपये ३९ हजार ५८५ रुपयांचा विमा परतावा अदा करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी : पुनर्रचित हवामानाधारित फळपीक विमा योजना २०१८-१९ (आंबे बहर)अंतर्गत जिल्ह्यातील ४९९ शेतकऱ्यांना संत्रा, केळी, आंबा या फळपिकांच्या नुकसानीबद्दल २ कोटी ४२ लाख ४९ हजार ५६१ रुपये परतावा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४५३ शेतकऱ्यांना २ कोटी १७ लाख रुपये ३९ हजार ५८५ रुपयांचा विमा परतावा अदा करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत २०१८-१९ मध्ये आंबे बहरसाठी जिल्ह्यातील केळी पिकांसाठी गंगाखेड, केकरजवळा, मानवत, पेडगाव, सिंगणापूर, पाथरी, आवलगाव या मंडळांचा, संत्रा फळपीकांसाठी जांब, मानवत, कात्नेश्वर, पूर्णा, मोसंबी फळपीकासाठी केकरजवळा, मानवत, पाथरी, चुडावा, सेलू, आंबा पिकासाठी केकरजवळा, मानवत, पिंगळी, लिमला या मंडळांचा समावेश होता. तर लिंबू या फळपिकासाठी दैठणा मंडळाचा समावेश होता.

अधिसूचित मंडळांतील ५६० शेतकऱ्यांनी ४६३.०३ हेक्टरवरील केळी, आंबा, संत्रा, मोसंबी, लिंबू या फळपिकांसाठी ३ कोटी ७५ लाख ८५ हजार २५० रुपये रकमेचे विमा संरक्षण घेतले. त्यासाठी शेतकऱ्यांनी १८ लाख ७९ हजार २७५ रुपये विमा हप्ता भरला. शेतकरी तसेच केंद्र आणि राज्य शासन यांच्या हिश्शांचा मिळून एकूण १ कोटी ४४ लाख ७७ हजार १९९ रुपये एवढा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला.

विमा कंपनीने केळी पिकांच्या नुकसानीबद्दल ४६ शेतकऱ्यांना, आंबा पिकांच्या नुकसानीबद्दल ८ शेतकऱ्यांना, संत्रा पिकांच्या नुकसानीबद्दल ४४५ शेतकऱ्यांना २ कोटी ४२ लाख ४९ हजार ५६१ रुपये एवढा विमा परतावा मंजूर करण्यात आला.  ४५३ शेतकऱ्यांना २ कोटी १७ लाख ३९ हजार ५८५ रुपये एवढी परताव्याची रक्कम अदा केली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...