परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. परंतु जिल्ह्यातील ३९ पैकी २० मंडळांमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित १९ मंडळांमध्ये मात्र वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. चारठाणा (ता. जिंतूर) मंडळामध्ये सर्वांत कमी ४५.८ टक्के, तर पाथरी मंडळाध्ये सर्वाधिक १५८.८ टक्के पाऊस झाला.

परभणी जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४.६२ मिलिमीटर आहे. या वर्षी आॅक्टोबरअखेरपर्यंत ७२१.७१ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या (८०.८४ टक्के) पाऊस झाला. २०१२ मध्ये ६३५.७ मिलिमीटर (८२.०८ टक्के), २०१३ मध्ये ८८१.२० मिलिमीटर (११३.८५ टक्के), २०१४ मध्ये ३५७.७० मिलिमीटर (४८.१८ टक्के), २०१५ मध्ये ३४०.४६ मिलिमीटर (४३.९५ टक्के), २०१६ मध्ये ८३८.०९ मिलिमीटर (१०८.२६ टक्के), २०१७ मध्ये ५२९.५० मिलिमीटर (६८.३५ टक्के), २०१८ मध्ये ४६३.०१ मिलिमीटर (५९.७७ टक्के) पाऊस झाला आहे.

२०१९ मध्ये ७९७.७१ मिलिमीटर (१०२.९७ टक्के) म्हणजेच वार्षिक सरासरीपेक्षा २.९७ टक्के जास्त पाऊस झाला. आॅक्टोबर महिन्यात परभणी जिल्ह्यात ५२.९१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात २२१.९४ मिलिमीटर (४१९.५ टक्के) पाऊस झाला.

जिंतूर तालुक्यातील चारठाणा मंडळाची वार्षिक पावसाची सरासरी ८११.७० मिलिमीटर आहे. परंतु यंदा या मंडळात ३७२ मिलिमीटर म्हणजेच ४५.८ टक्के एवढा पाऊस झाला. पाथरी मंडळाची वार्षिक सरासरी ७६८ मिलिमीटर आहे. परंतु यंदा या मंडळात १२२० मिलिमीटर म्हणजेच १५८.८ टक्के पाऊस झाला.

सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेली मंडळे ः झरी (१०३.६ टक्के), पालम  (११९.९ टक्के), चाटोरी (१२२.८ टक्के), बनवस (१३९.९ टक्के), पूर्णा (१२८.३ टक्के), ताडकळस (१११.३ टक्के), चुडावा (१५२.८ टक्के), गंगाखेड (१२६.१ टक्के), राणीसावरगाव (१०४.६ टक्के), माखणी (१०३ टक्के), सोनपेठ (१२३.१ टक्के), सेलू (१२२.८ टक्के), देऊळगाव (१४१.४ टक्के), पाथरी (१५८.८ टक्के), हदगाव (१२७ टक्के), सावंगी म्हाळसा (१११.१ टक्के), बामणी (१०७.२ टक्के), मानवत (१२०.१ टक्के), कोल्हा (१०८.५ टक्के).

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेली मंडळे ः परभणी शहर (६९.४ टक्के), परभणी ग्रामीण (६०.५ टक्के), सिंगणापूर (७३.२ टक्के), दैठणा (६३.४ टक्के), पेडगाव (७०.५ टक्के), पिंगळी (७६.७ टक्के), जांब (६३.८ टक्के), लिमला (९५.२ टक्के), कात्नेश्वर (८६.८ टक्के), महातपुरी (९९.६ टक्के), आवलगाव (८५.५ टक्के), कुपटा (७८.१ टक्के), वालूर (८४.१ टक्के), चिकलठाणा (८४.१ टक्के), बाभळगाव (८२ टक्के), जिंतूर (६३.८ टक्के), बोरी (६९.१ टक्के), चारठाणा (४५.८ टक्के), आडगाव (७८.६ टक्के), केकरजवळा (८०.३ टक्के).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com