परभणी जिल्ह्यात सुधारित हंगामी पैसेवारी ५९.३२ पैसे !

परभणी जिल्ह्यात सुधारित हंगामी पैसेवारी ५९.३२ पैसे
परभणी जिल्ह्यात सुधारित हंगामी पैसेवारी ५९.३२ पैसे

परभणी : जिल्ह्यातील पैसेवारीसाठी पात्र ८४८ गावांची यंदाच्या (२०१९-२०) खरीप हंगामातील पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५९.३२ पैसे आली आहे. यंदा नऊ तालुक्यातील ८४३ गावांची खरिपाची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा जास्त आली आहे. मात्र परभणी तालुक्यातील ५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या ३० सप्टेंबर रोजी खरिपाची हंगामी पैसेवारी सरासरी ६१.८४ पैसे आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी (ता. ३१) जिल्हा प्रशासनातर्फे खरिपाची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली.

जिल्ह्यात एकूण ८५२ गावे असून, त्यापैकी बलसा (ता. परभणी) या गावाचे कृषी क्षेत्र कृषी विद्यापीठासाठी, तर करडखेडा (ता. सेलू), चौधरणी खु., लिंबाळा (ता. जिंतूर) या चार गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणासाठी संपादित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत. जिल्ह्यातील लागवडीयोग्य ५ लाख ५८ हजार ७२९.९३ हेक्टर क्षेत्रापैकी यंदा हंगामात ५ लाख ३४ हजार ३४७ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली. परंतु, २४ हजार ३८२ हेक्टर एवढे क्षेत्र पडीक राहिले.

यंदा जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची सुधारित हंगामी  पैसेवारी सरासरी ५९.३२ पैसे एवढी आली आहे. नऊ तालुक्यातील ८४३ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे पेक्षा जास्त आहे. परंतु, परभणी तालुक्यातील १३१ पैकी १२६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त, तर सायाळा, टाकळगव्हाण, परळगव्हाण, झाडगाव, लोहगाव या ५ गावांची सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) आणि सुधारित हंगामी पैसेवारी

तालुका गावे पेरणी क्षेत्र पैसेवारी
परभणी १३१  ९९१३८ ६१.२५
जिंतूर १६९ ८३९६६ ५९.६०
सेलू ९४ ६५२७८  ५५.००
मानवत ५४ ४५१६६ ६०.६४
पाथरी  ५८ ४७०३७ ६३.४०
सोनपेठ ६०   ३२३०७ ५५.५०
गंगाखेड १०५  ५८६७४   ५९.५७
पालम  ८२ ४५६५० ५५.६६
पूर्णा ९५  ५७१०१ ६३.२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com