परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे सिंचन क्षेत्रात घट

 In Parbhani district, irrigation sector declines due to damages  dams
In Parbhani district, irrigation sector declines due to damages dams

परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागातंर्गंत जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे यावरील बांधकाम पूर्ण झालेल्या ५२ कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये यंदा पाणी अडविण्यात आले. त्यामुळे १ हजार ७ हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळाले. परंतु, अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे नादुरुस्त आहेत. त्यामुळे पाणी वाहून गेले. परिणामी, सिंचन क्षेत्रात घट झाली.

जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागामार्फत जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढ्यांवर एकूण ५४ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. त्यामध्ये परभणी, गंगाखेड तालुक्यांत प्रत्येकी ८, पूर्णा, पालम, सेलू तालुक्यात प्रत्येकी ४ बंधारे, मानवत तालुक्यात ६ , सोनपेठ तालुक्यात ३, पाथरीत १ आणि जिंतूरमध्ये १६ बंधारे बांधण्यात आले. त्यांची एकूण पाणीसाठवण क्षमता ६ हजार ८५६ सहस्त्रघनमीटर आहे. त्यावर १ हजार ३६९ हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळू शकते.

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात या बंधाऱ्यांचे प्रवेशद्वार टाकून पाणी अडविण्यात येते. २०१८ च्या ऑक्टोबर महिन्यात ४५ बंधाऱ्यांचे गेट टाकून पाणी अडविण्यात आले. परंतु, त्यावर्षी अल्प पावसामुळे केवळ ६६५ सहस्त्रघनमीटर पाणीसाठा जमा झाला. त्यावर ९० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले. 

२०१९ च्या जून अखेरपर्यंत जिल्ह्यात ५४ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली. गतवर्षीच्या पावसाळ्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस सुरु होता. त्यामुळे ५४ पैकी ५२ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट टाकून पाणी अडविण्यात आले. एकूण ५ हजार १३४ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे एकूण १ हजार ७ हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी मिळाले. उर्वरित कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पाण्याचा प्रवाह नसल्यामुळे, बांधकाम सुस्थितीत नसल्यामुळे पाणी अडविण्यात आले नव्हते. अनेक बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात आले. परंतु, दरवाजे नादुरुस्त असल्यामुळे त्यामधून पाणी वाहून गेले, असे संबंधित सूत्रांनी सांगितले.

पाणी अडविलेले कोल्हापुरी बंधारे स्थिती

तालुका संख्या पाणीसाठा सिंचन क्षेत्र (हेक्टर)
परभणी १९०१ ३६३
जिंतूर  १४ ७४६  १५६
सेलू ४  ४३८ ८४
मानवत ६२० ११५
पाथरी २९
सोनपेठ  १६६ ४२
गंगाखेड ४४८ १०३
पालम  ५२० ७९
पूर्णा २६६  ६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com