परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार नोंदणीची नावे वगळली

पणन महासंघाच्या परभणी, पाथरी, गंगाखेड येथील केंद्रांवर नवीन सहा ग्रेडर नियुक्त केले आहेत. नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस पावसाळा सुरु होण्यापूर्वी खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक,(सहकारी संस्था), परभणी.
 In Parbhani district, the names of double registration of sale of cotton were omitted
In Parbhani district, the names of double registration of sale of cotton were omitted

परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ (फेडरेशन) च्या खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी गंगाखेड तालुक्यातील २ हजार ९३२ शेतकऱ्यांनी दुबार ऑनलाइन नोंदणी केल्याचे छाननीनंतर आढळून आले. एकापेक्षा जास्तवेळा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची छाननी केली जात आहे. आता एकूण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 

खरेदीला गती देण्यासाठी परभणी, पाथरी, गंगाखेड येथील केंद्रांवर सहा ग्रेडर नियुक्त करण्यात आले आहेत. बुधवार (ता. २७) पर्यंत ८ हजार ७१९ नोंदणीकृत शेतकऱ्यांचा २ लाख ५५ हजार ४१९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. 

कापूस विक्रीसाठी नोंदणी बंधनकारक केल्यानंतर १० बाजार समित्यांकडे ४६ हजार ७७६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. गंगाखेड बाजार समितीमध्ये सर्वाधिक १४ हजार ६११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु, छाननीमध्ये दुबार नोंदणीची नावे वगळण्यात आली. आता जिल्ह्यात ४३ हजार ८४४ नोंदणीकृत शेतकरी शिल्लक राहिले आहेत. 

लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी शासकीय आणि खासगी असा सुमारे १ लाख ८ हजार ९४३ शेतकऱ्यांचा २६ लाख १० हजार ८९९.२१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता. लॉकडाउनमध्ये जिल्ह्यात ‘सीसीआय’ची ६ आणि पणन महासंघाच्या ४ मिळून एकूण १० केंद्रांवर कापूस खरेदी झाला.

खासगी बाजार, बाजार समित्यातील व्यापारी, थेट पणन परवानाधारकांनी एकूण २० हजार १६३ शेतकऱ्यांचा २ लाख ७६ हजार ५७२ क्विंटल कापूस खरेदी केला. आजवर शासकीय आणि खाजगी असा एकूण २८ हजार ८८२ शेतकऱ्यांचा ५ लाख ३१ हजार ९९२ क्विंटल, तर लॉकडाऊनपूर्वी आणि त्यामधील एकूण १ लाख ३७ हजार ८२५ शेतकऱ्यांचा ३१ लाख ४२ हजार ८८१ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.  लॉकडाउनमधील कापूस खरेदी (क्विंटल) 

खरेदीदार शेतकरी संख्या खरेदी 
पणन महासंघ ४५८२ १४३३८७.५५
सीसीआय ४१३७ ११२०३२.१८
खासगी बाजार ४८२१ ५८०४७.५०
बाजार समितीतील व्यापारी १५३३५ २१८३००.९
थेट पणन परवानाधारक २४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com