Agriculture News in Marathi Parbhani district Overcast in two circles | Agrowon

परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत अतिवृष्टी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांमध्ये रविवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड या तालुक्यांतील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली.

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांमध्ये रविवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड या तालुक्यांतील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. रविवारी (ता. २६) दुपारी अडीचच्या सुमारास परभणी, तसेच अन्य मंडलांत ढगांच्या गडगडात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे निचरा होत नसल्यामुळे उभी पिके सडत आहेत.

कापणीची कामे खोळंबल्याने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. बोंडांतून फुटलेला कापूस भिजून सरकीतून कोंब फुटत आहे. निसर्गाने तोंडचा घास हिरवून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत सरासरी १७.२ मिमी पाऊस झाला. जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांमध्ये जोरदार पाऊस झाला. चारठाणा (ता. जिंतूर), पिंपळदरी (ता. गंगाखेड) मंडलात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांमध्ये सरासरी १३ मिमी पाऊस झाला.

पालम तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता. निम्न दुधना धरणातील विसर्ग वाढविण्यात आल्यानंतर शेतामध्ये पाणी शिरून सेलू, मानवत तालुक्यातील नदीकाठच्या गावातील पिके हातची गेली आहेत. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांतील काही मंडलांत जोरदार पाऊस झाला. सिद्धेश्‍वर धरणातील विसर्गामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरल्याने औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. पाऊस उघडीप देत नसल्याने पीक नुकसानीचे सत्र सुरूच आहे. शेतमालाची प्रत खालावली आहे. 

मंडलनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे) 
परभणी : चारठाणा ६८.३, बामणी ३७, सेलू २१.३, चिकलठाणा ३८.३, मोरेगाव ३१.५, रामपुरी १८,सोनपेठ २०, आवलगाव २३.३, शेळगाव १५.५, वडगाव ४३.५, गंगाखेड २९, महातपुरी ३८.३,माखणी ३२.२, राणीसावरगाव ३५.३ पिंपळदरी ८०.३, चुडावा २०, पालम ४१.८, चाटोरी २१, रावराजूर ३३.३. 
हिंगोली जिल्हा : हिंगोली ४६.८, नरसी नामेदव १८.८, सिरसम ६१.५, डिग्रस कऱ्हाळे ३०.३, माळहिवरा ३२, वारंगा २९, येळेगाव २३.८, सेनगाव १५.५. 


इतर बातम्या
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...