Agriculture News in Marathi Parbhani district Overcast in two circles | Page 3 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत अतिवृष्टी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांमध्ये रविवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड या तालुक्यांतील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली.

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांमध्ये रविवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड या तालुक्यांतील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. रविवारी (ता. २६) दुपारी अडीचच्या सुमारास परभणी, तसेच अन्य मंडलांत ढगांच्या गडगडात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे निचरा होत नसल्यामुळे उभी पिके सडत आहेत.

कापणीची कामे खोळंबल्याने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. बोंडांतून फुटलेला कापूस भिजून सरकीतून कोंब फुटत आहे. निसर्गाने तोंडचा घास हिरवून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत सरासरी १७.२ मिमी पाऊस झाला. जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांमध्ये जोरदार पाऊस झाला. चारठाणा (ता. जिंतूर), पिंपळदरी (ता. गंगाखेड) मंडलात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांमध्ये सरासरी १३ मिमी पाऊस झाला.

पालम तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता. निम्न दुधना धरणातील विसर्ग वाढविण्यात आल्यानंतर शेतामध्ये पाणी शिरून सेलू, मानवत तालुक्यातील नदीकाठच्या गावातील पिके हातची गेली आहेत. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांतील काही मंडलांत जोरदार पाऊस झाला. सिद्धेश्‍वर धरणातील विसर्गामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरल्याने औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. पाऊस उघडीप देत नसल्याने पीक नुकसानीचे सत्र सुरूच आहे. शेतमालाची प्रत खालावली आहे. 

मंडलनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे) 
परभणी : चारठाणा ६८.३, बामणी ३७, सेलू २१.३, चिकलठाणा ३८.३, मोरेगाव ३१.५, रामपुरी १८,सोनपेठ २०, आवलगाव २३.३, शेळगाव १५.५, वडगाव ४३.५, गंगाखेड २९, महातपुरी ३८.३,माखणी ३२.२, राणीसावरगाव ३५.३ पिंपळदरी ८०.३, चुडावा २०, पालम ४१.८, चाटोरी २१, रावराजूर ३३.३. 
हिंगोली जिल्हा : हिंगोली ४६.८, नरसी नामेदव १८.८, सिरसम ६१.५, डिग्रस कऱ्हाळे ३०.३, माळहिवरा ३२, वारंगा २९, येळेगाव २३.८, सेनगाव १५.५. 


इतर बातम्या
वीजबिल वसुलीविरोधात अकोटमध्ये आंदोलनअकोला ः थकीत वीजबिल वसुलीसाठी एकीकडे महावितरणकडून...
आजऱ्यात चिखलातच भातकापणी आजरा, जि. कोल्हापूर ः ढगाळ वातावरण तालुक्यात कायम...
पारोळ्यात वृक्ष लागवड योजना पुन्हा सुरू...पारोळा, जि. जळगाव : तालुक्यात मागील काही...
कळसमध्ये वीजबिल वसुलीविरोधात...कळसमध्ये, जि. पुणे ः कृषिपंपांची वीजबिल वसुली...
‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानात ...सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन...
शासकीय कृषी तंत्रनिकेतन पदविका प्रवेशास...नाशिक : राज्य शासनाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ...
पीक पाहणीस विमा कंपनीचे प्रतिनिधी...वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी: तालुक्यात अतिवृष्टी व...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरापासून कोकण, मध्य...
उडीद, मुगाच्या उत्पादनात घट नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील...
कृषी कायद्यांच्या माघारीवर  कॅबिनेट...नवी दिल्ली : वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनापुढे...
राज्यात गायीच्या दुधाच्या  खरेदीदरात...पुणे ः राज्यातील खासगी डेअरीचालकांना गायीच्या...
खेडा खरेदीमुळे दारव्हा  बाजार समिती...यवतमाळ ः दारव्हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपल्या...
सोलापूर ः रब्बी हंगामातील प्रमुख...सोलापूर ः शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा बेसुमार व...
विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा : अजित...मुंबई ः सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व...
पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल कारखान्याला...सोलापूर ः पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी...
 मोबाइल रसवंती ठरली शेतीला आधार आर्णी, जि. यवतमाळ ः रोजगार आणि नोकरीच्या शोधात...
परभणीत लाळ्या खुरकूत लसीकरण थंडावले परभणी ः जिल्ह्यात लस मात्रा उपलब्ध न झाल्यामुळे...
  कृषी विभागाकडून आतापर्यंत  सात...पुणेः कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाने...
मराठवाड्यात ६८५ लघू प्रकल्पांत ७५ टक्‍...औरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांत ८७...
बिळाशी परिसरातील ऊस लागला वाळूबिळाशी, जि. सांगली ः जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या...