agriculture news in marathi In Parbhani district, Rs 2.75 crore will have to be returned | Agrowon

परभणी जिल्ह्यात पावणे तीन कोटींचा निधी परत द्यावा लागणार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

परभणी : वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत २०१९-२० या वर्षात निवडलेल्या गावामध्ये मृदा, जलसंधारणाच्या कामे, जीवन्नोती उपजिविका उपक्रमांवर निधी खर्चाचे प्रमाण ३५ ते ४० टक्के राहिले. त्यामुळे अखर्चित २ कोटी ४४ लाख ८० हजार रुपये निधी शासनास परत करावा लागला. ग्राम पाणलोट समित्यांकडील अखर्चित सुमारे पाऊणे तीन कोटी रुपये निधी देखील परत पाठवावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. 

परभणी : वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत २०१९-२० या वर्षात निवडलेल्या गावामध्ये मृदा, जलसंधारणाच्या कामे, जीवन्नोती उपजिविका उपक्रमांवर निधी खर्चाचे प्रमाण ३५ ते ४० टक्के राहिले. त्यामुळे अखर्चित २ कोटी ४४ लाख ८० हजार रुपये निधी शासनास परत करावा लागला. ग्राम पाणलोट समित्यांकडील अखर्चित सुमारे पाऊणे तीन कोटी रुपये निधी देखील परत पाठवावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. 

वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गंत निवडलेल्या गावांमध्ये नैसर्गिक संसाधन विकास अंतर्गंत ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, सलग समतळ चर आदी मृदा जलसंधारणाची कामे केली जातात. पूर्वी ही कामे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांतर्फे केली जात असत. परंतु, या कामाचे पुनर्विलोकन केल्यानंतर ती असमाधानकारक होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कामे आता सेवाभावी संस्थांतर्फे केली जात आहे. परंतु,अनेक सेवाभावी संस्थांची कामे सुमार दर्जाची आहेत. प्रत्यक्षात झालेले काम आणि त्यावर झालेल्या खर्च यात तफावत येत आहे. 

त्यामुळे संस्थाचालक आणि कंत्राटदार यांच्यात वाद होत आहेत. त्यात कामे रखडत चालली आहेत. मृदा जलसंधारणाच्या जेमतेम ३५ ते ४० टक्के निधी खर्च झाला आहे.त्यामुळे अखर्चित राहिलेला २ कोटी ४४ लाख ८० हजारावर निधी परत करावा लागला. 

वसुंधरा पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतंर्गंत परभणी तीन आणि सेलू तालुक्यातील दोन पाणलोट या गावांमध्ये एकूण ३२ ग्राम पाणलोट समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पाणलोट समित्यांमार्फत गावातील बारा बलुतेदांना उद्योग -व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. भूमिहीन नागिरकांना शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, शेतकऱ्यांना सिंचनाची साधने घेण्यासाठी निधीची तरतूद आहे. परंतु ग्राम पाणलोट क्षेत्र विकास समित्यांच्या उदासीनतेमुळे या उपक्रमांची अमंलबजावणी झाली नाही. त्यामुळे हा अखर्चित निधी परत करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...