परभणी जिल्ह्यात खरिपाची १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी : कृषी विभाग

परभणी जिल्ह्यात खरिपाची १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी
परभणी जिल्ह्यात खरिपाची १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी

परभणी : यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ३३ हजार ५३९ हेक्टरवर (१०२.२४ टक्के) पेरणी झाली आहे. सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून एकूण २ लाख ४० हजार हेक्टरवर (२७०.६९ टक्के) पेरणी झाली आहे. कपाशीच्या क्षेत्रात मात्र घट झाली आहे. २ लाख २ हजार ३१६ हेक्टरवर (९६. ५८ टक्के) तिची लागवड झाली आहे. तूर, मूग, उडिद या कडधान्यासह, ज्वारी, बाजरी तृणाधान्यांच्या क्षेत्रात घट झाली आहे. चार तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात खरीप पिकांचे सर्वसाधारणक्षेत्र ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर आहे. यंदाचे खरीप पेरणीक्षेत्र अंतिम करण्यात आलेले नाही. परंतु, शुक्रवार (ता. २) पर्यंत ५ लाख ३३ हजार ५३९ हेक्टरवर (१०२.२४ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा सोयाबीन वगळता अन्य कोणत्याही पिकांची सर्वसाधारण क्षेत्राएवढीही पेरणी झालेली नाही. ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्ये, तूर,मूग, उडिद या कडधान्य पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे.

जिंतूर तालुक्यात (१३४. ५८ टक्के), मानवत तालुक्यात (१०२.९५ टक्के), पाथरी तालुक्यात (१००.७३ टक्के), गंगाखेड तालुक्यात (१३५.७७ टक्के) म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परंतु, परभणी तालुक्यात (९१.५४ टक्के) सेलू (९९.७९ टक्के), सोनपेठ तालुक्यात (८७.३९ टक्के), पालम (८३.७३ टक्के), पूर्णा तालुक्यात (८३ टक्के) म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com