परभणी जिल्ह्यात रब्बीची सव्वादोन टक्के क्षेत्रावरच पेरणी

ऑक्टोबमध्ये १० एकर हरभरा आणि चार एकर करडईची पेरणी केली. त्यात पावसाचे पाणी साचून राहिले. त्यामुळे पीक जळून गेले. - प्रभाकर चव्हाळ,मोरेगाव, ता. सेलू, जि. परभणी.
परभणी जिल्ह्यात रब्बीची २.२४ टक्के क्षेत्रावरच पेरणी
परभणी जिल्ह्यात रब्बीची २.२४ टक्के क्षेत्रावरच पेरणी

परभणी : सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. ऑक्टोबरअखेरपर्यंत ६ हजार २२४ हेक्टरवर (२.२४ टक्के) क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. जोरदार पावसामुळे अनेक गावांतील उगवलेली ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बियाण्यांची उगवण नीट न झाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर, गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार २६४ हेक्टर, जवस १ हजार १९९ हेक्टर, सूर्यफूल १ हजार ९३ हेक्टर आदींचा त्यात समावेश आहे. ऑक्टोबरमध्ये ज्वारी, करडई, हरभऱ्याची, तर नोव्हेंबरमध्ये गव्हाची पेरणी केली जाते. परंतु, यंदा पावसामुळे अनेक भागांत अद्याप पेरणीस सुरवात झाली नाही. 

सप्टेंबरच्या अखेरीस तसेच ऑक्टोबरच्या सुरवातीस मूग, उडीद, सोयाबीननंतर सेलू, मानवत, पाथरी, परभणी तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभऱ्याची पेरणी केली. परंतु, त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे ज्वारीच्या पिकांमध्ये पाणी साचून राहिल्याने ती पिवळी पडली. वाढ खुंटली. हरभऱ्याची उगवण व्यवस्थितीत झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार आहे.

२५ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ज्वारीची ५ हजार ३७३ हेक्टर (३.३८ टक्के), हरभऱ्याची ८४१ हेक्टर (१.५८ टक्के) पेरणी झाली. परभणी तालुक्यात १५८ हेक्टर, जिंतूरमध्ये ४०५, सेलूमध्ये ९९८, मानवतमध्ये २५२, पाथरीत ७५४, सोनपेठमध्ये ३७, गंगाखेडमध्ये ६५, पालममध्ये १५, तर पूर्णा तालुक्यात २० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com