परभणी जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक हातचे गेले

परभणी ः जिल्ह्यात यंदा मंगळवार (ता.१४) पर्यंत ९००.३ मिमी (१३४.१ टक्के) पाऊस झाला आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत (वार्षिक) अपेक्षित सरासरी (८३८.९ मिमी) पावसापेक्षा ६१.४ मिमी अधिक, तर मंगळवार (ता.१४) पर्यंत अपेक्षित (६७१.२ मिमी) पावसापेक्षा २२९.१ मिमी अधिक पाऊस झाला आहे.
In Parbhani district, soybean, cotton and tur crops were lost
In Parbhani district, soybean, cotton and tur crops were lost

परभणी ः जिल्ह्यात यंदा मंगळवार (ता.१४) पर्यंत ९००.३ मिमी (१३४.१ टक्के) पाऊस झाला आहे. जून ते ऑक्टोबर  या कालावधीत (वार्षिक) अपेक्षित सरासरी (८३८.९ मिमी) पावसापेक्षा ६१.४ मिमी अधिक, तर मंगळवार (ता.१४) पर्यंत अपेक्षित (६७१.२ मिमी) पावसापेक्षा २२९.१ मिमी अधिक पाऊस झाला  आहे. सततच्या पावसामुळे चिभड, पाणथळ जमिनीतून पाणी वाहत आहे. अनेक भागांतील पाणी साचून राहिल्याने सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके हातची गेली  आहेत.

परभणी जिल्ह्यात जून, जुलै या महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात सरासरी १६९ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु यंदा सप्टेंबरच्या पहिल्या १३ दिवसांतच महिन्याची सरासरी ओलांडली. यंदा सप्टेंबर महिन्यात मंगळवार (ता.१४) पर्यंत १८४.३ मिमी (२३३.६ टक्के) पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबरमध्ये ७६१.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे. यंदाच्या पावसाळ्यात मंगळवार (ता.१४) पर्यंत ६७१.२ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ९००.३ मिमी म्हणजेच २२९.१ मिमी जास्त पाऊस झाला आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.१४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी १०.६ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ५२ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, गंगाखेड तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सरासरी १४.४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील ३० पैकी २९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, वसमत, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.

मंडळनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे)

परभणी जिल्हा ः दैठणा २६.८, बामणी २५.३, सेलू २५.३, गंगाखेड २१, महातपुरी ३५,  पेठशिवणी २५.३, रावराजूर १५.३, कात्नेश्वर १५.३, चुडावा ३०.हिंगोली जिल्हा ः हिंगोली १६.५, नरसी नामदेव १५.५, सिरसम ४६, बासंबा १६.८,  वसमत २३.५, आंबा १७.५, हयातनगर २०.५, हट्टा १६.३, टेंभुर्णी २०.८, गोरेगाव ३१, आजेगाव १९.३, साखरा १८.८, पानकन्हेरगाव १८.३, हत्ता १७.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com