परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १६.६० टक्केच पीक कर्जवाटप

परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक, खासगी, सहकारी क्षेत्रातील बॅंकांनी यंदा खरिपात सोमवार(ता. ६)पर्यंत ५९ हजार १११ शेतकऱ्यांना २७४ कोटी ८२ लाख रुपयांचेच (१६.६० टक्के) पीक कर्जवाटप केले आहे.
 In Parbhani district till now only 16.60 percent crop loan disbursement
In Parbhani district till now only 16.60 percent crop loan disbursement

परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक, खासगी, सहकारी क्षेत्रातील बॅंकांनी यंदा खरिपात  सोमवार(ता. ६)पर्यंत ५९ हजार १११ शेतकऱ्यांना २७४ कोटी ८२ लाख रुपयांचेच (१६.६० टक्के) पीक कर्जवाटप केले आहे. यंदा आजवर नवीन पीक कर्ज मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ९ हजार ४७० एवढी आहे; तर ४९ हजार ६४१ शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे नूतनीकरण केले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक कर्जवाटपाची टक्केवारी जवळपास दुप्पट आहे.

यंदा जिल्ह्यात १ हजार ६५५ कोटी २० लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. आजवर ९ हजार ४७० नवीन शेतकऱ्यांना ७४ कोटी ३७ लाख रुपये पीककर्ज देण्यात आले. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ३ हजार २१९ शेतकऱ्यांना २८ कोटी ३ लाख रुपये, खासगी बॅंकांनी ३३३ शेतकऱ्यांना ५ कोटी ७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ५ हजार ९१८ शेतकऱ्यांना ४१ कोटी २७ लाखांचे पीक कर्जवाटप केले. जिल्हा बॅंकेने आजून नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले नाही.

पीक कर्जाचे नूतनीकरण केलेल्या ४९ हजार ६४१ शेतकऱ्यांनी २०० कोटी ४५ लाख रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण केले. त्यात जिल्हा बॅंकेच्या सभासदांची संख्या सर्वाधिक म्हणजे ४१ हजार ५० आहे. त्यांनी १२९ कोटी २ लाख रुपये कर्जाचे नूतनीकरण केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या २ हजार ५२६ शेतकऱ्यांची १७ कोटी ६९ लाख रुपयांचे, राष्ट्रीय बॅंकांच्या ५ हजार ९७९ शेतकऱ्यांनी ५२ कोटी ४२ लाख रुपये, खासगी बॅंकांच्या ७६ शेतकऱ्यांनी १ कोटी ३२ लाख रुपयांच्या कर्जाचे नूतनीकरण केले.

गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी दुप्पट 

गतवर्षी विविध बॅंकांनी ३० जूनअखेर २० हजार ४८४ शेतकऱ्यांना ११२ कोटी ६५ लाख रुपये (७.६६ टक्के) पीक कर्जवाटप केले होते. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कर्जवाटपाची गती दुप्पट असली, तरी उद्दिष्टपूर्ती मात्र अद्याप कोसो दूर आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com