परभणीत प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये

परभणीत प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये
परभणीत प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये

परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २३) टोमॅटोची ६५० क्विंटल आवक होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून टोमॅटोची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ३०० ते ६५० क्विंटल आवक  झाली असताना प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते २००० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. २३) ६५० क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये होते. तर किरकोळ विक्री २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com