परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.२०) शेवग्याची ५ क्विंटल आवक झाली. त्याच्या शेंगांना प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये काकडीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. दोडक्याची १० क्विटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. 

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ३५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ४ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची १२ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले.

शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले.

वांग्यांची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १२०० क्रेट आवक झाली. त्यांना प्रतिक्रेट १०० ते १५६० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १२० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ४०० ते ९०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ३५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

कोबीची १० क्विंटल आवक झाली, तर दर प्रतिक्विंटल १२०० ते २००० मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रुटची ५ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रूपये दर मिळाला. लिंबांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३५०० ते ६००० रुपये दर मिळाले.

पातीच्या कांद्याची ७ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. मक्याची ५० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com