Agriculture news in marathi, Parbhani fenugreek 600 to 1000 per hundred | Agrowon

परभणीत मेथीची पेंडी ६०० ते १००० रुपये प्रतिशेकडा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १) मेथीच्या ८ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १) मेथीच्या ८ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा ६०० ते १००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची २ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला ५००० ते ७००० रुपये दर मिळाले. गवारीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ३ क्विंटल आवक झाली. तिला ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १५ क्विंटलला आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ८०० ते १८०० रुपये दर मिळाले.

वांग्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला २५०० ते ३००० रुपये मिळाले. करडईच्या भाजीची ८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ७००० रुपये दर मिळाले. 

टोमॅटोची ९०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला १५० ते ३०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक, तर दर २००० ते २५०० रुपये राहिले. 

फ्लॅावरची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रुटची ६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ४ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. मक्याची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...