परभणीत भुईमूग प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये

परभणीत भुईमूग प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये
परभणीत भुईमूग प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ४) भुईमूग शेंगाची ३० क्विंटल आवक होती. भुईमूग शेंगांना प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ११ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कारल्याची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. गोलभोपळ्याची (देवडांगर) २५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले. लाल भोपळ्याची (काशीफळ) ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. काकडीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते १००० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. पालकाची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.

शेरूची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले.

टोमॅटोची ६०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेट २०० ते ३०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची १५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० मिळाले. भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

कंदवर्गीय भाज्यांमध्ये पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. बीट रुटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. रताळांची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४५०० रुपये दर मिळाले. मक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com