Agriculture news in marathi Parbhani, Hingoli starts buying cotton | Agrowon

परभणी, हिंगोलीत कापूस खरेदी सुरू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

यंदाच्या खरेदी हंगामात आधारभूत किंमत खरेदी दराने (एमएसपी) भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (सीसीआय) परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी दोन केंद्रांवर कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे.

परभणी  : यंदाच्या खरेदी हंगामात आधारभूत किंमत खरेदी दराने (एमएसपी) भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (सीसीआय) परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी दोन केंद्रांवर कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत दोन जिल्ह्यांत मिळून सुमारे ४० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.

यंदा भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने परभणी जिल्ह्यात जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा, ताडकळस या ठिकाणी कापूस खरेदीचे नियोजन आहे. त्यापैकी गुरुवार (ता. १९) ते शनिवार (ता.२१) या कालावधीत सेलू येथील पाच जिनिंग कारखान्यांमध्ये तर मानवत येथील चार जिनिंग कारखान्यांमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे. मानवत येथील १२ जिनिंग कारखान्यांपैकी सध्या चार जिनिंग कारखान्यांमध्ये कापूस खरेदीस सुरुवात झाली आहे.

कापसातील ओलाव्यानुसार प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ७२५ रुपये दर दिले जात आहेत. उर्वरित जिनिंग कारखान्यातील देखभाल दुरुस्तीची कामे आटोपल्यानंतर तेथेही कापूस खरेदी सुरू केली जाईल. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मार्केट यार्डावर कापूस विक्रीसाठी आणताना सोबत सातबारा उतारा, आधारकार्ड, बॅंक खाते पुस्तक यांच्या सत्यप्रती घेऊन याव्यात. चुकारे शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा केले जातील. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावून येणे आवश्यक आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती पंकज आंबेगावकर यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात सीसीआयच्या वतीने जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) येथे गुरुवारपासून  (ता.१९) खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, दोन दिवसांत सुमारे २ हजार ५०० क्विंटलवर कापूस खरेदी झाली आहे. हयातनगर (ता. वसमत) येथे शुक्रवारपासून  (ता. २०) खरेदी सुरू झाली असून, सुमारे ३ हजार ५०० क्विंटल कापूस खरेदी झाला  आहे.

पणन महासंघाच्या कापूस खरेदीची प्रतिक्षा
राज्य सहकारी कापूस  उत्पादक पणन महासंघाच्या परभणी विभागातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात अद्याप कापूस खरेदी सुरू झालेली  नाही.गतवर्षी (२०२०) परभणी जिल्ह्यातील  परभणी, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ तालुक्यातील तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथील केंद्रांवर खरेदी करण्यात आली होती. यंदा गंगाखेड आणि पाथरी येथील केंद्रांवर खरेदी सुरू  करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 असे दिले जातील दर.....
लांब आणि मध्यम धागा, मायक्रोनेयर व्हॅल्यूनुसार दर दिले जात आहेत. लांब धाग्याच्या कापसामध्ये  (बीबी वाण) लांबी २९.५ ते ३०.५ एमएम आणि मायक्रोनेयर व्हॅल्यू ३.५ ते ४.३ असेल तर प्रतिक्विंटल ५ हजार ८२५ रुपये, एच ४ वाणासाठी २७.५ ते २८.५ एमएम आणि मायक्रोनेयर व्हॅल्यू ३.५ ते ४.७ साठी प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रुपये, मध्यम धाग्याच्या (एलआरए ५१६६ वाण) धाग्याची लांबी २६ ते २६.५ एमएम आणि मायक्रोनेयर व्हॅल्यू ३.५ ते ४.९ असेल तर प्रतिक्विंटल ५ हजार ६१५ रुपये दर दिले जातील. लांब धाग्याच्या कापसासाठी मायक्रोनेयर व्हॅल्यू रेंज पेक्षा कमी असेल तर दरात प्रतिक्विंटल २५ रुपये तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल १५ रुपये कपात केली जाईल.


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...