परभणीत जांभूळ प्रतिक्विंटल ४००० ते ८००० रुपये

परभणीत जांभूळ प्रतिक्विंटल ४००० ते ८००० रुपये
परभणीत जांभूळ प्रतिक्विंटल ४००० ते ८००० रुपये

परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील जांभळाची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता. २१) जांभळाची ४ क्विंटल आवक झाली होती. जांभळाला प्रतिक्विंटल ४००० ते ८००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची २ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले. चुक्याची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५००० ते ८००० रुपये दर मिळाले. वांग्याची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. भेंडीची १२ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये दर मिळाले.

कोबीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची २ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. भुईमूग शेंगांची १५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाले. फळांमध्ये कैरीची २०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. लिंबांची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com