परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये

परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये

परभणीः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २४) भेंडीची २५ क्विंटल आवक होती. भेंडीला प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वालाची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ७ क्विंटल झाली असताना प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक झाली होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

मुगाच्या शेंगांची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते २००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये पालकाची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. शेफूची १५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले.

मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ९० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये दर मिळाले. वांग्याची ५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले.

काकडीची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपये दर मिळाले. कारल्याची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये दर मिळाले.

लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर मिळाले. मुळ्याची १५ हजार नग आवक असताना प्रतिशेकडा १०० ते ३०० रुपये दर मिळाले. बीट रुटची ४ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. मक्याची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com