परभणीत राष्ट्रीयकृत, खासगी बॅंकाचे कर्जवाटप रखडले

परभणी : जिल्ह्यात यंदा खरिपात मंगळवार (ता.१५) पर्यंत विविध बॅंकांनी १ लाख १३ हजार १५७ शेतकऱ्यांना ६९६ कोटी ७९ लाख रुपये (४२.१०) टक्के पीक कर्जवाटप केले.
  In Parbhani, the lending of nationalized, private banks stalled
In Parbhani, the lending of nationalized, private banks stalled

परभणी : जिल्ह्यात यंदा खरिपात मंगळवार (ता.१५) पर्यंत विविध बॅंकांनी १ लाख १३ हजार १५७ शेतकऱ्यांना ६९६ कोटी ७९ लाख रुपये (४२.१०) टक्के पीक कर्जवाटप केले. गतवर्षी (२०१९) च्या तुलनेत यंदा दुप्पटीहून अधिक वाटप झाले असले, तरी उद्दिष्टपुर्तीसाठी निम्म्याहून अधिक टप्पा पार करायचा राहिला आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांचे वाटप २५ टक्केच्या आत, तर खासगी बॅंकांचे ४० टक्केच्या आतच रखडले आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने उद्दिष्टाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्हा बॅंक कर्जवाटपात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र रब्बी हंगाम उंबरठ्यावर येऊन पोचललेला असताना राष्ट्रीयकृत बॅंका खरिपाचे पीककर्ज देण्यास चालढकल करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बॅंकांत हेलपाटे मारावे लागत आहेत.

बॅंकांना एकूण १ हजार ६५५ कोटी २० लाख रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना १ हजार १५ कोटी ९९ लाख रुपये, खासगी बॅंका ८४ कोटी ६६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक २२५ कोटी २९ लाख रुपये, जिल्हा बॅंक १८६ कोटी २६ लाख रुपये उद्दिष्ट आहे.

मंगळवार (ता.१५) पर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांनी ३२ हजार १८ शेतकऱ्यांना  २८५ कोटी ३९ लाख रुपये, खासगी बॅंकांनी १ हजार ७२४ शेतकऱ्यांना २८ कोटी ९८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ३३ हजार १९१ शेतकऱ्यांना २३६ कोटी ६० लाख रुपये, जिल्हा बॅंकेने ४६ हजार २२४ शेतकऱ्यांना १४५ कोटी ५८२ रुपयांचे पीक कर्जवाटप केले.

आजवर ७२ हजार ९५० शेतकऱ्यांनी ३४१ कोटी ९३ लाख रुपये रकमेच्या पीककर्जाचे नुतनीकरण करुन घेतले. तर, ४० हजार २०७ नवीन शेतकऱ्यांना ३४५ कोटी ८६ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. जिल्हा बॅंकेने नवीन शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले नाही.

गतवर्षी (२०१९) याच तारखेला ४७ हजार ९५५ शेतकऱ्यांना २६५ कोटी ८३ लाख रुपये (१८.०८ टक्के) पीककर्ज वाटप केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीक कर्जवाटपाच्या गती दुपटीहून अधिक असली, तरी उद्दिष्टपुर्ती मात्र अजून कोसोदूर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com