परभणी बाजार समितीला ई-नामअंतर्गत प्रथम पुरस्कार

परभणी बाजार समितीला ई-नामअंतर्गत प्रथम पुरस्कार
परभणी बाजार समितीला ई-नामअंतर्गत प्रथम पुरस्कार

परभणी ः ई -नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) ची प्रभावीपणे अमंलबजावणी केल्याबद्दल परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. शनिवारी (ता. २३) सोलापूर येथे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई- नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) अंतर्गत समावेश झाल्यानंतर कार्यक्षेत्रातील गावांमध्ये ग्रामसभा घेऊन ई -नाम बाबत जनजागृती करण्यात आली. २०१७-१८ या वर्षी ई-नाम अंतर्गत १ लाख ७६ हजार ८२९ क्विंटल शेतमालाची इनगेट एन्ट्री आवक झाली. त्यापैकी ९९ हजार ७६२ क्विंटल शेतमालाच्या खरेदी -विक्रीचे व्यवहार झाले. 

एकूण ६ हजार ६५५ शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. शेतमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एकूण १३ कोटी ११ लाख रुपये एवढी रक्कम ई- पेमेंटद्वारे अदा करण्यात आली. ई-नाम अंतर्गतच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यातून प्रथम क्रमांकांचा पुरस्कार जाहीर झाला. शनिवारी (ता. २३) सोलापूर येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रोख पाच लाख रुपये व प्रशस्तीपत्र असा पुरस्कार देऊन बाजार समितीचा गौरव करण्यात आला. 

सभापती समशेर वरपुडकर, सचिव विलास मस्के यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, सहायक निबंधक श्री. राठोड, सल्लागार सुरेश तळणीकर, सहायक सचिव संजय तळणीकर, विलास रेंगे, मंगशे बिके, प्रकाश करवटे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com