परभणी, नांदेड, हिंगोलीत ‘मुठभर कापूस जाळो’ आंदोलन

परभणी : शेतकऱ्यांच्या घरातील सर्व कापूस शासकीय हमीभावाने भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ (फेडरेशन) यांच्यामार्फत खरेदी करावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता.२२) ‘मूठभर कापूस जाळो’ आंदोलन करण्यात आले. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांनी घरासमोर मूठभर कापूस जाळून सरकारचा निषेध केला.
Parbhani, Nanded, Hingoli 'Handful of Cotton Burn' Movement

परभणी जिल्ह्यात संबर (ता.परभणी),कोक, मारवाडी (ता.जिंतूर), ढेंगळी पिंपळगाव, धनेगाव, कान्हड (ता.सेलू), मानोली (ता.मानवत), थडी उक्कडगाव, थडी पिंपळगाव, वाडी पिंपळगाव, कोथाळा, नरवाडी, वडगाव, सोनपेठ (ता.सोनपेठ) आदीस पाथरी, पूर्णा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ‘मूठभर कापूस जाळो’ आंदोलन करण्यात आले. 

गोविंद जोशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, युवा आघाडी प्रमुख सुधीर बिंदू, गणेश पवार, अनंत पवार, रमाकांत गोरे आदीसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्यासह कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी नांदेड, लोहा, कंधार तसेच अन्य तालुक्यात कापूस जाळून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. 

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंढानागनाथ, वसमत आदी तालुक्यात देवीसिंह ढोबळे आदीसह कार्यकर्ते शेतकऱ्यांनी कापूस जाळो आंदोलन करत शेतकऱ्यांच्या घरातील सर्व कापूस खरेदी करण्याची मागणी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com