सूर्य तळपला; परभणी चाळिशीपार

सूर्य तळपला; परभणी चाळिशीपार
सूर्य तळपला; परभणी चाळिशीपार

पुणे : सूर्य तळपायला लागला असल्याने राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाच नोंद झाली आहे. तर कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले होते. उन्हाच्या झळा वाढताच दिवस-रात्रीच्या उकाड्यातही वाढ झाली असून, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  मागील आठवड्यापासून राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत आहे. परभणी येथे मार्च महिन्याच्या सुरवातीलाच तापमान राज्यातील उच्चांकी ४० अंशांवर गेला आहे. तेथे गतवर्षी ३१ मार्च रोजी आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, नांदेड, अमरावती, चंद्रपूर, नागपूर येथे तापमान ३९ अंशांवर, तर नगर, बीड, उस्मानाबाद, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ येथे तापमान ३८ अंशांवर गेले आहे. कोकणात कमाल तापमान २९ ते ३१ अंशांच्या दरम्यान आहे.  विदर्भ ते दक्षिण कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित होऊन निर्माण झोलली द्रोणीय स्थिती छत्तीसगडपर्यंत विस्तारली आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान, तयार होऊन मंगळवारी सकाळपासूनच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे ढग जमा झाले होते. आज (ता. १३) आणि उद्या (ता. १४) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  मंगळवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.१ (१५.७), नगर ३८.२, जळगाव - (१७.०), कोल्हापूर ३६.५ (२०.७), महाबळेश्वर ३१.८ (१८.४), मालेगाव ३७.६ (१८.०), नाशिक ३२.६ (१५.९), सांगली ३७.९ (१८.१), सातारा ३६.६ (१७.८), सोलापूर ३९.३ (२१.६), अलिबाग - (२१.४), डहाणू २८.९ (२०.०), सांताक्रूझ ३०.८ (२१.६), रत्नागिरी ३१.८ (२०.८), औरंगाबाद ३५.६ , बीड ३८.२(१८.९), नांदेड ३९.५ (२०.५), उस्मानाबाद ३८.८, परभणी ४०.१ (२०.०), अकोला ३८.० (२१.०), अमरावती ३९.४ (२०.८), बुलडाणा ३२.६ (१९.६), चंद्रपूर ३९.२ (२५.४), गडचिरोली ३७.२ (२३.०), गोंदिया ३४.८ (१४.२), नागपूर ३९.१ (१९.४), वर्धा ३८.८ (२२.८), वाशीम ३७.० (१९.०), यवतमाळ ३८.० (२०.४).  उन्हाचा चटका वाढलेली ठिकाणे : परभणी ४०.१, नांदेड ३९.५, अमरावती ३९.४, सोलापूर ३९.३, चंद्रपूर ३९.२, नागपूर ३९.१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com