सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथील शेतकऱ्यांनी आंबा, काजू या मुख्य पिकांन
बाजारभाव बातम्या
परभणीत पेरू १००० ते कमाल २५०० रुपये क्विंंटल
परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१३) पेरूची ३०० क्विंंटल आवक होती. पेरूला प्रतिक्विंंटल किमान १००० ते कमाल २५०० रुपये, तर सरासरी १७५० रुपये दर मिळाले.
परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.१३) पेरूची ३०० क्विंंटल आवक होती. पेरूला प्रतिक्विंंटल किमान १००० ते कमाल २५०० रुपये, तर सरासरी १७५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १२ क्विंंटल आवक झाली. दर ३००० ते ५००० रुपये, तर सरासरी ४००० रुपये मिळाले. कारल्याची १० क्विंंटल आवक होऊन ३००० ते ४०००, सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. काकडीची ५० क्विंंटल आवक होऊन ७०० ते १५००, तर सरासरी ११०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची १० क्विंंटल आवक झाली. दर १५०० ते २५००, तर सरासरी २००० रुपये मिळाले. शेवग्याची ८ क्विंंटल आवक होऊन ५००० ते ७०००, तर सरासरी ६००० रुपये दर मिळाले.
गवारीची १५ क्विंंटल आवक होऊन ३५०० ते ५०००, तर सरासरी ४२५० रुपये दर मिळाले. चवळीची ५ क्विंंटल आवक झाली. ३००० ते ५०००, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले. पालकाची १६ क्विंंटल आवक होऊन ६०० ते १२००, तर सरासरी ९०० रुपये दर मिळाले.
शेपूची २० क्विंंटल आवक झाली. दर ८०० ते १५००, सरासरी ६५० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंंटल आवक होऊन १५०० ते २०००, तर सरासरी १७५० रुपये दर मिळाले. मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ४०० ते ७००, तर सरासरी ५५० रुपये दर मिळाले.
कोथिंबिरीची ३०० क्विंंटल आवक झाली. १००० ते ३५००, सरासरी २२५० रुपये दर मिळाले. टोमॅटोची २२०० क्रेट आवक झाली. प्रतिक्रेटला २५० ते ५०० तर सरासरी ३७० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंंटल आवक झाली. दर २५०० ते ५०००, तर सरासरी ३७५० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ९ क्विंंटल आवक होऊन २५०० ते ४५००, तर सरासरी ४००० रुपये दर मिळाले.
भेंडी सरासरी ३२५० रुपये
भेंडीची १५ क्विंंटल आवक होऊन २५०० ते ४०००, तर सरासरी ३२५० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंंटल आवक झाली. दर १५०० ते ३०००, तर सरासरी २२५० रुपये दर मिळाले. कोबीची ६० क्विंंटल आवक झाली.
८०० ते १५००, सरासरी ६५० रुपये दर मिळाले. लिंबांची ४० क्विंंटल आवक होऊन ४०० ते ८००, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाले. आवळ्याची २५ क्विंंटल आवक झाली. ८०० ते १५०० रुपये, तर सरासरी १२५० रुपये दर मिळाले.
- 1 of 65
- ››