परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के पीककर्जवाटप

परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के पीककर्जवाटप
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के पीककर्जवाटप

परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी हंगामात ३१३ कोटी ४७ लाख रुपये एवढे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत २ हजार १६२ शेतकऱ्यांना १६ कोटी ४२ लाख रुपये (५.२४ टक्के) एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. या बाबत जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी माहिती दिली.

यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यातील विविध बॅंकांना मिळून एकूण ३१३ कोटी ४७ लाख रुपये एवढे पीककर्ज शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना १७३ कोटी १३ लाख रुपये, खासगी बॅँकांना ३३ कोटी ९८ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ३१ कोटी ८२ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ७४ कोटी ५४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

३१ ऑक्टोबर अखेरपर्यंत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ५८७ शेतकऱ्यांना ५ कोटी ८० लाख रुपये (३.३५ टक्के), खासगी बॅंकांनी १५७ शेतकऱ्यांना १ कोटी ७५ लाख रुपये (५.१५ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १ हजार ९१ शेतकऱ्यांना ७ कोटी ६१ लाख रुपये (२३.९२ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने ३२७ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये (१.६९ टक्के) असे एकूण २ हजार १६२ शेतकऱ्यांना १६ कोटी ४२ लाख रुपये (५.२४ टक्के) एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा बॅंक, खासगी बॅंकाची कर्जवाटपाची गती संथ आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने कर्जवाटपात आघाडी घेतली आहे.

खरिपात २२.२९ टक्के कर्जवाटप यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ५९ हजार ७७८ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ६९ लाख रुपये (२२.२९ टक्के) एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले. खरिपात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ११ हजार ५९३ शेतकऱ्यांना १११ कोटी २७ लाख रुपये (१०.८० टक्के), खासगी बॅंकांनी २ हजार ६६ शेतकऱ्यांना ३ कोटी १ लाख रुपये (४२.६१ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ११ हजार ४५७ शेतकऱ्यांना ७८ कोटी २८ लाख रुपये (३९.११ टक्के), जिल्हा बॅंकेने ३४ हजार ६६२ शेतकऱ्यांना १०६ कोटी ९ लाख रुपये (६४.११ टक्के) एवढे कर्जवाटप केले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com