परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले भरुन वाहु लागले

परभणीतील 24 मंडळात अतिवृष्टी  नदी, नाले भरुन वाहु लागले    
परभणीतील 24 मंडळात अतिवृष्टी  नदी, नाले भरुन वाहु लागले    

परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे जोरदार धुमशान सुरु आहे.शुक्रवारी (ता.17) पहाटे आठ वाजे पर्यंत जिल्ह्यात 72.86  मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील  24 महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

सव्वा महिण्यापासून दडी मारलेल्या पावसाचे बुधवारी (ता.15) रात्री आगमन झाले आहे.त्यानंतर अद्याप पर्यंत पाऊस सुरुच आहे.गुरुवारी दिवसभर सर्वच जिल्ह्याला झोडपुन काढल्यानंतर रात्रभर पावसाचा तडाखा सुरु होता.या पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आला आहे.जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, दुधना, पूर्णा नदिच्या पात्रात चांगली वाढ झाली असून नदी काठच्या गावांना 

प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.शुक्रवारी पहाटे आठ वाजेपर्यंत  जिल्ह्यात पावसाची 72.80 मिलीमिटर नोंद झाली आहे.जून पासून आता पर्यंत 380.16 अर्थात 49.01 टक्के पाऊस झाला आहे.आणखी दोन दिवस जोरदार पाऊस राहील अशी शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. सिंगणापूर-68,झरी-88,पेडगाव-69,जांब-56,पूर्णा-104,ताडकळस-69,चुडावा-79,सोनपेठ-94,सेलु-137,देऊळगाव-85,कुपटा-88,वालूर-83,चिकलठाणा-108,पाथरी-412,बाभळगाव-80,हादगाव-79,जिंतूर-104,सावंगी-94,बोरी-76,चारठणा,83,बामणी-124,मानवत-133,केकरजवळा-79,कोल्हा-68 या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com