agriculture news in Marathi, Parbhani records minimum temperature in state, Maharashtra | Agrowon

परभणीमध्ये नीचांकी तापमानाची नोंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

पुणे : ऑक्टोबर महिना अखेरीस राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद होत आहे. परभणी येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली असून, किमान तापमानाने गेल्या पाच वर्षांतील नीचांक गाठला आहे. दिवसाचे तापमान पस्तीशी पार असताना रात्रीचा गारठा वाढल्याने तापमानातील तफावत वाढली आहे.

पुणे : ऑक्टोबर महिना अखेरीस राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद होत आहे. परभणी येथे राज्यातील नीचांकी १३.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली असून, किमान तापमानाने गेल्या पाच वर्षांतील नीचांक गाठला आहे. दिवसाचे तापमान पस्तीशी पार असताना रात्रीचा गारठा वाढल्याने तापमानातील तफावत वाढली आहे.

राज्यात महिन्याच्या सुरवातीपासून उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ३५ अंशांच्या पुढे असून, सांताक्रूझ येथे उच्चांकी ३७.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. तर उर्वरित राज्यांत दिवसाच्या तापमानातही घट होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकणाचा अपवाद वगळता राज्यात सर्वच ठिकाणी रात्रीचे तापमान कमी होत आहे. किमान तापमानात घट झाल्याने, पहाटेच्या वेळी गारठाही वाढू लागला आहे.

परभणीमध्ये २०१२ नंतर ऑक्टोबर महिन्याच्या तापमानात मोठी घट झाली आहे. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यांनतर शनिवारी तापमान १३.१ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. नगर येथे १३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. राज्यातील किमान तापमानात आणखी घट होणार असून, निरभ्र आकाशासह मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवार (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६ (१५.९), नगर -(१३.८), जळगाव ३७.० (१७.०), कोल्हापूर ३२.२ (१९.४), महाबळेश्‍वर २६.७ (१७.२), मालेगाव ३५.२ (१८.४), नाशिक ३३.१ (१५.३), सांगली ३२.६ (१६.९), सातारा ३२.९ (१५.६), सोलापूर ३४.७ (१७.४), सांताक्रूझ ३७.१ (२२.८), अलिबाग ३६.२ (२२.५), रत्नागिरी ३६.५ (२१.३), डहाणू ३५.३ (२४.१), आैरंगाबाद ३४.५ (१६.४), परभणी - (१३.१), नांदेड - (१७.५), अकोला ३६.७ (१८.५), अमरावती ३५.४ (१८.४), बुलडाणा ३४.२ (१८.८), चंद्रपूर ३४.२ (१९.८), गोंदिया ३३.५ (१७.७), नागपूर ३४.७ (१६.६), वर्धा ३५.२ (१६.५), यवतमाळ ३६.० (१७.०).

इतर अॅग्रो विशेष
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...