दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
बाजारभाव बातम्या
परभणीत शेवग्याला क्विंटलला ५००० ते ८००० रुपये
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) शेवग्याची ४ क्विंटल आवक होती. त्याला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ८००० रुपये, तर सर्वसाधारण ६५०० रुपये दर मिळाले.
परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ८) शेवग्याची ४ क्विंटल आवक होती. त्याला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ८००० रुपये, तर सर्वसाधारण ६५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटाण्याची ४०० क्विंटल आवक झाली. त्यांना सर्वसाधारण ११५० रुपये दर मिळाले. गवारीची १२ क्विंटल आवक, तर सर्वसाधारण ३२५० रुपये दर मिळाले. चवळीची ६ क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर २५०० रुपये, वालाची १० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळाले.
वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ३००० रुपये, कारल्याची १५ क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ११०० रुपये, काकडीची ७० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ७५० रुपये मिळाले.
दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ७५० रुपये, पालकाची १५ क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ७५० रुपये, शेपूची २० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ७५० रुपये, चुक्याला सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळाले.
पपईला सर्वसाधारण ७५० रुपये
कोबीची ६० क्विंटल आवक, सर्वसाधारण ७५० रुपये दर, गाजराची ३०० क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ११०० रुपये, लिंबांची १५ क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर २००० रुपये, पेरुची ७० क्विंटल आवक, सर्वसाधारण दर २२५० रुपये, पपईची ७० क्विंटल आवक, सर्वसाधारण दर ७५० रुपये, मक्याची २० क्विंटल आवक, तर सर्वसाधारण दर ११५० रुपये मिळाले.
- 1 of 67
- ››