परभणीत शेवगा १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल

in Parbhani Shewaga 1500 to 2000 rupees per quintal
in Parbhani Shewaga 1500 to 2000 rupees per quintal

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १३) शेवग्याची १५ क्विंटल आवक होती. शेवग्याला प्रतिक्विंटलला किमान १५०० ते कमाल २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्याला किमान १०० ते कमाल २०० रुपये दर मिळाले. पालकाची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची १५० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला किमान ६०० ते कमाल १२०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची १० क्विंटल आवक झाली. चवळीला प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले. 

गवारीची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला किमान ३००० ते कमाल ४००० रुपये दर मिळाले. वालाची १८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक झाली.

प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची ३० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. 

काकडीची ५० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान ४०० ते कमाल ६०० रुपये दर मिळाले. वांग्यांची ७० क्विंटल आवक, तर दर ४०० ते ८०० रुपये मिळाले. टोमॅटोची ४ हजार क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ३० ते ६० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक झाली. दर  १२०० ते २००० रुपये मिळाला. 

लिंबांना १२०० ते २००० रुपये

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान ८०० ते कमाल १५०० रुपये दर मिळाले. मुळ्याची ८ हजार नग आवक होऊन शेकडा १०० ते २०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १००० रुपये दर मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com