agriculture news in marathi, In Parbhani Vangi anticipated Rs 1000 to Rs 2500 | Agrowon

परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १९) वांग्याची ४५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. शेपूची १० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक झाली. तिला प्रतिशेकडा ३०० ते ६०० रुपयांचा दर मिळाला. कोथिंबिरीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. गवारीची १५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाले.

चवळीची ३ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ४०० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल १२०० ते १५०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची २५ क्विंटल आवक झाली. तिला ४००० ते ६००० रुपयांचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची ४ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये, भेंडीची २५ क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये, फ्लॅावरची १२ क्विंटल आवक, तर दर २५०० ते ५००० रुपये, कोबीची २० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपयांचा मिळाला.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची ८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ३५०० ते ४५०० रुपये दर मिळाले. दोडक्याची ६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपयांचा दर मिळाला. काकडीची ४० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बिट रुटची ४ क्विंटल आवक होऊन तिला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कैरीची १५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...